छत्रपती संभाजीनगरफुलंब्री
Trending

फुलंब्री पोलिस स्टेशन हद्दीत सावंगीत भरदुपारी अवघ्या अर्ध्या तासात अपार्टमेंटमधील तीन फ्लॅटमध्ये चोरी !

संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – एकाच अपार्टमेंटमधील तीन फ्लॅटमध्ये अवघ्या अर्ध्या तासांत चोरट्यांनी चोरी करून सुमारे १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. ही घटना फुलंब्री पोलिस स्टेशन हद्दीतील सावंगी येथील बसस्थानक परिसरातील अपार्टमेंटमध्ये भरदुपारी घडली. पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली आहे.

महिला फिर्यादीने पोलिसांना सांगितले की, दिनांक-19/12/2022 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्या कामानिमित्त फाट्यावर गेल्या होत्या. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्या घरी परतल्या असता त्यांना शेजार्यांनी सांगितले की त्यांच्या फ्लॅटचे कुलुप कोणीतरी उघडले आहे. त्यांनी लगेच दुस-या मजल्यावरील फ्लॅटवर जावून पाहिले असता मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडलेले त्यांच्या निदर्शनास आले.

आतील कपाट तोडून त्यामधील सोने व पैसे चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एकूण 72000/- रुपयांचा ऐवज चोरट्यांने चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्याच समोरील फ्लॅटमध्ये देखील कुलूप तोडले होते. तेथून एकूण 15000/- रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.

तसेच अन्य एका फ्लॅटमध्ये देखील चोरट्यांनी चोरी केली. त्यांच्या फ्लॅटमधून एकूण 35000/- हजार रुपयांचा ऐवज चोरी गेल्याची प्राथमिक माहिती आहे. एकाच अपार्टमेंटमधील तीन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी चोरी केली तीन फ्लॅटमधून एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!