गंगापूर
Trending

गंगापूर ते भेंडाळा फाटा रोडवरील मंगलकार्यालयातील पाच स्टॉक रुम चोरट्यांनी फोडल्या !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – गंगापूर ते भेंडाळा फाटा रोडवरील विराज हॉटेलचे शेजारी असलेले साई मंगल कार्यालयातील पाच स्टॉक रूम फोडून चोरट्यांनी ४५ हजारांचे सामान चोरीस नेले.

निलेश देविदास गावंडे (रा लक्ष्मीकॉलनी, संचेती कॉम्पलेक्स गंगापूर) हे मंडप व्यवसाय करतात.  गंगापूर ते भेंडाळा फाटा रोडवरील विराज हॉटेलचे शेजारी असलेले साई मंगल कार्यालय त्यांनी भाडे तत्वावर चालवण्यासाठी घेतलेले आहे. सदर कार्यालयात मंडपचे डेकोरेशनचे सामान ठेवलेले आहे.

दि. 05/06/2023 रोजी पूर्वी तीन ते चार महिन्यांपासून मंगल कार्यालयाच्या स्टॉक रुममध्ये  मंडप सामान ठेवून सदर गोदामाला व्यवस्थतीत कुलुप लावले होते. दि. 06/06/2023 रोजी निलेश देविदास गावंडे हे सध्याकाळी साडे चार वाजेच्या सुमारास साई मंगल कार्यालयातील स्टॉक रूम जवळ गेले. तेव्हा कार्यालयातील सामान ठेवलेले एकूण पाच रुमचे कुलूप तुटलेले दिसले.

सदर रुममध्ये जावून पाहणी केली असता संपूर्ण सामान अस्थाव्यस्थ दिसले. रुममधील सामानाची चोरट्यांनी चोरून नेल्याचे खात्री पटली. एकूण 45000 रुपयांचे सामान चोरीस गेले. याप्रकरणी मंडप व्यावसायीक निलेश देविदास गावंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा शोध पोलिस घेत आहे.

Back to top button
error: Content is protected !!