वैजापूर
Trending

वैजापूरमध्ये अंधाराचा फायदा घेवून वाहनातील डिझेल चोरणारे चोरटे जेरबंद ! चिकटगाव, राहत्याचे दोघे गस्तीवरील पोलिसांच्या जाळ्यात !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. 14- रात्रीचा अंधाराचा फायदा घेवून वाहनातील डिझेल चोरी करणा-या दोघांना वैजापूर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून 5,21,000/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमोल अविनाश कुंदे (वय 19 वर्षे रा. एकरुखा ता. राहता जि. अहमदनगर), सोमनाथ ज्ञानेश्वर बोर्डे (वय 25 वर्षे रा. चिकटगाव ता. वैजापूर ह.मु. शिर्डी जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

दिनांक 13/7/ 23 रोजी मध्यरात्रीनंतर साधारण 01:50 वाजेच्या सुमारास वैजापूर शहरातील खान गल्लीतून बजरंग चौकाकडे एक पांढर्या रंगाची कार भरधाव जाताना शहरात रात्रीच्या गस्तीवरिल पोलिसांचे निदर्शनास आली. वाहन संशयित वाटल्याने गस्तीवरिल पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा करून सदर वाहन थांबवले. पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी कारमधील दोन व्यक्तींना कार बाहेर येण्यास सांगून रात्रीचे भरधाव कोठे जात आहेत, याबाबत विचारपूस करता ते पोलिसांना शिर्डी येथे दर्शनासाठी गेले असल्याबाबत खोट सांगून उडवा उडवीचे उत्तरे देवू लागले.

यावरून या दोघांवर अधीक संशय बळावल्याने त्यांचे पांढ-या रंगाची स्वीफ्ट कारची पाहणी केली असता कारच्या डिगीमध्ये 35 लिटर क्षमतेचे पाच निळ्या रंगाचे प्लास्टिक कॅन, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड़, लोखंडी चैन, छोटे नल्ट बोल्ट खोलण्याचे पान्हे, प्लास्टीक नळी, असा एकूण एवेज मिळून आला. सदर व्यक्ती हे वैजापूर शहर व परिसरातील उभ्या असलेल्या वाहनातील डिझेल चोरण्यासाठी आलेले असल्याबाबत पक्की खात्री झाल्याने त्यांना विश्वासात घेवून कसोशिने विचारपूस करता त्यांनी त्यांची नावे 1) अमोल अविनाश कुंदे वय 19 वर्षे रा. एकरुखा ता. राहता जि. अहमदनगर, २) सोमनाथ ज्ञानेश्वर बोर्डे वय 25 वर्षे रा. चिकटगाव ता. वैजापूर ह.मु. शिर्डी जि. अहमदनगर असे सांगून वैजापूर शहरात ते वाहनातील डिझेल चोरी करण्यासाठी आलेले असल्याबाबत सांगितले. यापूर्वी सुध्दा त्यांनी वैजापूर शहरातील वाहनातून डिझेल चोरी केल्याची माहिती दिली.

दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे वैजापूर येथे गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पांढ-या रंगाची स्वीफ्ट कार सह एकूण 5,21,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास वैजापूर पोलीस करित आहेत.

ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक, वैजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे पो.उप.नि. कल्याण पवार, पोलीस अंमलदार दादासाहेब गायकवाड, योगेश झाल्टे, कुलदीप नरवडे, महेश बिरुटे, प्रशांत गीते, संभाजी भोजने, पवन सुंदरडे, उमेश जमदाडे, रंजित चव्हाण यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!