छत्रपती संभाजीनगर
Trending

बुरखा ओढून दिली “मै तुम्हारी इज्जत उतारुंगा”ची धमकी, चार जणांवर गुन्हा दाखल !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७- बुरखा ओढून “मै तुम्हारी इज्जत उतारुंगा”अशी धमकी दिल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडण सोडवण्यास आलेल्या मुलीला व मुलालाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना रात्री ८ वाजेच्या सुमारास टाऊनहॉल जाहागीरदार मशिदजवळ छत्रपती संभाजीनगर परिसरात घडली.

1) अब्दुल वहीद अब्दुल समद 2)अब्दुल मुदतशीर अब्दुल वहीद 3)अब्दुल शेहबाज अब्दुल वहीद 4)शेख रसुल जानेमिया सर्व रा. टाऊनहॉल जहागीरदार मशिद जवळ छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात महिला फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे असून यातील आरोपी क्र.1 अब्दुल वहीद अब्दुल समद हा दारू पिवून आला व काहीएक कारण नसताना फिर्यादीच्या घरात आला. फिर्यादीच्या अंगातील बुरखा ओढल्याने फिर्यादीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य त्याने केले. फिर्यादीस म्हणाला की “मै तुम्हारी इज्जत उतारुंगा” अशी धमकी देवून शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण केली.

फिर्यादीची मुलगी व मुलगा हे दोघे भांडण सोडवण्यासाठी आले असता यातील चारही आरोपींनी संगणमत करून फिर्यादीची मुलगी व मुलगा यांनाही शिवीगाळ करून हाताचापटाने मारहाण करून जिवे मारुन टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिला फिर्यादीच्या फिर्यादीवरून पोनि गाडे यांच्या आदेशाने डिओ अधिकारी श्रेणी पोउपनि गायकवाड यांनी बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button
error: Content is protected !!