छत्रपती संभाजीनगर
Trending

एक कोटीचे कर्ज काढून देतो म्हणून 32 लाख 50 हजारांची फसवणूक ! बीड बायपासच्या सेवानिवृत्ताची सातारा पोलिसांत धाव, चौघांवर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – ट्रेड फंडातून एक कोटीचे कर्ज काढून देतो असे आमिष देवून एका सेवानिवृत्ताची 32 लाख 50 हजारांची फसवणूक करण्यात आली. मुंबईच्या चार भामट्यांनी ही फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२१ ते मार्च २०२२ या दरम्यान ही फसवणूक झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

अतुल मंगल घन (वय ६१ वर्षे, चौधरी हेरीटेज, रेणुका माता मंदिराजवळ, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर) असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. 1) सुयश अविनाश 2) सुयश घन, 3) राहुल साबळे 4) अजहर पटेल (रा.कांदेवली, मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत.

यातील आरोपीतांनी फिर्यादीस ट्रेड फंडातून 1,00,000,00/- (एक कोटी रुपये) कर्ज काढून देतो असे आमिष देवून विश्वास संपादन केला. कर्जासाठी फिर्यादीकडून काही रोख रक्कम व काही ऑन लाईन रक्कम असे एकूण 32,50,000/- (बत्तीस लाख, पन्नास हजार) रुपये घेवून आरोपीतांनी फिर्यादीची फसवणुक केलेली आहे.

याप्रकरणी अतुल मंगल घन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून . 1) सुयश अविनाश 2) सुयश घन, 3) राहुल साबळे 4) अजहर पटेल (रा.कांदेवली, मुंबई) यांच्यावर सातारा पोलिस स्टेशनमध्ये कलम ४२०, ४०६, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि शेवाळे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!