गंगापूरछत्रपती संभाजीनगर
Trending

गंगापूर ते लासूर स्टेशन रोडवरील बंद असलेल्या हॉटेल हंसराज जवळ तीन सशस्त्र दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या ! पिस्टल, जिवंत काडतूससह मुद्देमाल जप्त !!

गंगापूर पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – गंगापूर ते लासूर स्टेशन रोडवरील बंद असलेल्या हॉटेल हंसराज जवळ तीन सशस्त्र दरोडेखोरांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. गंगापूर पोलिसांनी पाठलाग करून त्यांना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून एक गावढी कट्टा (पिस्टल), एक जिवंत काडतुस, दोन ट्रकच्या बॅटरी, असा एकूण 40,000/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक 04/09/2023 रोजी पोलीस ठाणे गंगापूर पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले हे त्यांच्या पथकासह सायंकाळी गंगापूर ते  वैजापूर रोडवर मांजरी फाट्याजवळ पेट्रालिंग करित असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फेत माहिती मिळाली की, गंगापूर ते लासूर स्टेशन कडे जाणार्या रोडवरिल बंद असलेल्या हॉटेल हंसराज जवळ काही जण हे संशयित रित्या फिरत आहेत.

या माहितीवरून पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व त्यांचे पथक तात्काळ हॉटेल हंसराज लासुररोड दिशेन रवाना झाले. हॉटेल हंसराज पासून काही अंतरावर पोलिसांनी त्यांचे वाहन उभे केले. अंधार असल्याने बंद असलेल्या हॉटेल हंसराज परिसरात लपत छपत गेले असता तेथे काही संशयित व्यक्तीं असल्याबाबत हालचाल पोलीसांच्या लक्षात आली. यामुळे पोलिसांनी हॉटेल परिसराला घेराव घालून सापळा लावला. यामध्ये हॉटेल परिसराचे मागील बाजुने पोलीसांचे एक पथक तर समोरच्या बाजुने दुसरे पथक याप्रमाणे घेराव घातला.

हॉटेलमध्ये प्रवेश करून आतील पडलेल्या रुम मधून येणा-या व्यक्तींच्या आवाजाच्या दिशेन पोलीसांचे पथक पुढे पुढे जात असतांना खोलीतील व्यक्तींना पोलीसांची चाहुल लागताच त्यांनी पडक्याखोलीच्या बाहेर उडया मारून अंधारात शेतातील रस्त्याने सुसाट पळ काढला. पोलीसांनीही त्यांचा अंधारात पाठलाग सुरू केला. अंधाराचा फायदा घेवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना पोलीसांनी तीन व्यक्तींना अत्यंत शिताफिने पकडले. त्यांना त्यांची नावे विचारली असता 1) अनिल गोपीनाथ होन, वय 29 वर्ष, रा. सिध्येपूर, ता.गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर 2) कैलास दत्तात्र्य गव्हाणे, वय 24 वर्ष, रा. मंगलापूर, ता.नेवासा,जि.अहमदनगर. 3) आकाश संपत जाधव, वय 23 वर्ष रा. सिध्येपूर, ता.गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनग अशी सांगितली.

यावेळी त्यांना विश्वासात घेवून बंद हॉटेल मध्ये संशयित रित्या थांबल्याबाबत विचारपूस करता त्यांनी पोलीसांना उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे त्यांच्यावर अधिक संशय बळावल्याने त्यांना विश्वासात घेवून पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता यातील संशयित अनिल गोपीनाथ होन, वय 29 वर्ष, रा. सिध्येपूर, ता.गंगापूर याच्या कमरेला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आला आहे.

यावरुन त्यांची कसोशिने चौकशी करता ते त्यांनी यापूर्वी दिनांक 13/8/23 रोजी मध्यरात्री वैजापूर ते गंगापुर रोडवर आशीर्वाद पेट्रोल पंपासमोर शस्त्राचा धाक दाखवून एका ट्रक चालकाजवळील रोख रक्कम व ट्रकच्या दोन बॅटरी असा माल जबरीने चोरून नेला होता. याबाबत दाखल गुन्हयात ते पोलीसांना पाहिजे होते तेव्हा पासून ते स्वत:चे अस्तिव लपवून पोलीसांना गुंगारा देत लपत होते.

त्यांच्या ताब्यातुन एक गावढी कट्टा(पिस्टल), एक जिवंत काडतुस, दोन ट्रकच्या बॅटरी, असा एकूण 40,000/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हयात त्यांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास गंगापूर पोलीस करित आहेत.

ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, प्रकाश बेले, उपविभागीय पोलीस अधिकारी ,गंगापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजीत ताईतवाले, पोेलीस निरीक्षक,  अमोल कांबळे, अभिजीत डहाळे, तेनसिंग राठोड, राहुल वडमारे, विजय नागरे, मनोज नवले यांनी केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!