नगर रचना सहाय्यक अभियंता प्लॉटची गुंठेवारी करून देण्यासाठी लाचेच्या जाळ्यात ! म्हणाला, मी काम पूर्ण झाल्याशिवाय पैसे घेत नाही, चोरों के भी ईमान होते है !!
नांदेड, दि. ७ – प्लॉटची गुंठेवारी करून देण्यासाठी ७,००० /- रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने धर्माबाद पालिकेच्या नगर रचना सहाय्यक अभयंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी काम पूर्ण झाल्याशिवाय पैसे घेत नाही, अशी फुशारकी मारताना तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
प्रतिक राजेंद्र माळवदे (वय २९ वर्षे, व्यवसाय नोकरी, पद नगर रचना सहा. अभियंता, नगर पालीका कोंडलवाडी, अतिरीक्त कार्यभार धर्माबाद वर्ग २) व गणेश गंगाधर दुदुलवाड (वय ४२ वर्षे, व्यवसाय मेस चालक रा. रत्नाळी धर्माबाद जि. नांदेड) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांवर धर्माबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्या आईच्या नावे असलेल्या एक गुंठा प्लॉटची गुंठेवारी करण्यासाठी यातील एका व्यक्तीने नगर रचना सहाय्यक अभियंता प्रतिक राजेंद्र माळवदे यांच्या साठी रूपये १०,००० / – लाचेची पंचासमक्ष मागणी केली. नगर रचना सहाय्यक अभियंता प्रतिक राजेंद्र माळवदे यांनी पंचासमक्ष रूपये ७,००० /- घेण्याची सहमती दर्शविली.
यातील तक्रारदार हे दोन वेळा लाच देण्यासाठी नगर रचना सहाय्यक अभियंता प्रतिक राजेंद्र माळवदे यांच्याकडे पंचासह गेले असता मी काम पूर्ण झाल्याशिवाय पैसे घेत नाही असे म्हणून नगर रचना सहाय्यक अभियंता प्रतिक राजेंद्र माळवदे यांनी लाच स्वीकारली नाही. दिनांक ०६/०४/२०२३ रोजी पंचासमक्ष नगर रचना सहाय्यक अभियंता प्रतिक राजेंद्र माळवदे यांनी लाचेच्या रक्कमेतील फाईलसाठी लागणारी फिस रूपये २,८९२ /- ची वसुली लिपीक राजेश खटके यांच्याकडे जमा करण्यास पाठवून उर्वरीत लाचेची रक्कम स्वीकारली नाही. नगर रचना सहाय्यक अभियंता प्रतिक राजेंद्र माळवदे यांनी पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले म्हणून गुन्हा दाखल.
ही कार्यवाही ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड चे डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली, तसेच राजेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक यांच्या पर्यवेक्षणात पोलीस उपअधिक्षक प्रकाश वांद्रे, पोलीस उपधिक्षक अशोक इप्पर, सपोउपनि/गजेंद्र मांजरमकर, सपोउपनि /संतोष शेट्टे, पोकॉ/यशवंत दाबनवाड, पोना / बालाजी मेकाले, चापोह / गजानन राऊत यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe