महाराष्ट्र
Trending

जालना ते दिनेगाव विद्युतीकरण कार्य ! मनमाड जालना दरम्यान 175 किलोमीटरचे विद्युतीकरण अखेर पूर्ण !!

नांदेड, दि. २०- नांदेड विभागातील दिनेगाव ते जालना दरम्यान विद्युतीकरण कार्य पूर्ण करण्यात आले आहे. हा 7.2 किलोमीटरचा भाग मनमाड – मुदखेड – ढोणे विद्युतीकरण प्रकल्पाचा एक भाग आहे. यासह मनमाड-जालना दरम्यानचा 175 किलोमीटर अंतराचा विभाग आता पूर्ण विद्युतीकृत झाला आहे.

भारतीय रेल्वेचे मिशन विद्युतीकरण पुढे नेत, दक्षिण मध्य रेल्वेने आता नांदेड विभागातील दिनागाव-जालना दरम्यान 7.2 रूट किलोमीटर चे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. मनमाड – मुदखेड – ढोणे विद्युतीकरण प्रकल्पाचा एक भाग म्हणून या विभागाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे आत्ता मनमाड-जालना दरम्यान 174 किलोमीटर चे अंतर पूर्णतः विद्युतीकरण झाले आहे.

मनमाड – मुदखेड – ढोणे विद्युतीकरण प्रकल्पाला 2015-16 मध्ये 783 किलोमीटर अंतरासाठी, अंदाजे 865 कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पात महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे आणि तो वेगवेगळ्या टप्प्यात राबवला जात आहे. मनमाड-धर्माबाद दरम्यान महाराष्ट्रातील प्रकल्पाची लांबी अंदाजे 420 किलोमीटर आहे. अंकाई (मनमाड) – औरंगाबाद दरम्यानचा 111 किलोमीटरचा भाग मार्च, 2023 मध्ये पूर्ण झाला आहे, तर औरंगाबाद-दिनागाव दरम्यानचा 56 किलोमीटरचा भाग मार्च, 2023 मध्ये पूर्ण झाला आहे. आता, दिनागाव-जालना दरम्यानचे 7 किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे एकूण 174 किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

जालना – परभणी – मुदखेड – धर्माबाद दरम्यानच्या 246 किलोमीटरच्या उर्वरित विभागांमध्ये 2023 च्या अखेरीस विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवून कामे वेगाने प्रगतीपथावर आहेत. रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर रेल्वे इंजिन (ट्रॅक्शन पॉवर) बदलण्यातील लागणारा वेळ कमी होतो, प्रवासी आणि मालवाहू गाड्यांच्या मार्गातील अडथळा कमी होतो आणि रेल्वे गाड्यांची अखंड वाहतूक होण्यास मदत करते. यामुळे गाड्यांच्या सरासरी वेगात सुधारणा होण्यास मदत होते आणि त्यामुळे क्षमता वाढल्यामुळे या विभागांमध्ये अधिक गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात. हे शून्य कार्बन उत्सर्जनासह गाड्यांना उर्जा देण्याचे पर्यावरण-अनुकूल साधन देखील प्रदान करते, त्याच वेळी इंधनाच्या खर्चात बचत करते.

अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांनी सांगितले की 2023 च्या अखेरीस बीजी लाईनचे 100% विद्युतीकरण साध्य करण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वे मधील संपूर्ण रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण प्राधान्याने केले जात आहे. कर्मचारी आणि अधिकार्‍यांना संपूर्ण विद्युतीकरणाचे उद्दिष्ठ पूर्ण होई पर्यंत याच जोमाने कार्य सुरू ठेवण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.

Back to top button
error: Content is protected !!