छत्रपती संभाजीनगर
Trending

तलवार बाळगून बेगमपुरा परिसरात दहशत माजवणारा युवक गुन्हे शाखेच्या जाळ्यात ! पोलिसांना पाहताच धूम ठोकली, पाठलाग करून पकडले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – शहरातील बेगमपुरा परिसरात तलवार बाळगून दहशत निर्माण करीत फिरणार्या युवकास गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून तलवार जप्त केली. पोलिस पथकाला पाहून त्याने धूम ठोकली होती परंतू पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्याला पकडले.

छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 19/07/2023 रोजी पोलिसांना माहिती मिळाली की, हनुमान टेकडीकडे जाणा-या रोडवर, बेगमपुरा छत्रपती संभाजीनगर येथे एक जण हातात तलवार घेवून फिरत असून त्यामुळे आजुबाजुच्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यावरून गुन्हे शाखेचे पथक हनुमान टेकडीकडे जाणा-या रोडवर, बेगमपुरा भागात धडकले.

पोलिस पथकाला पाहून तो युवक पळून जावू लागला. त्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून त्यास जर्यान प्रोव्हिजन्सच्या समोर रोडवर शिताफीने पकडले. 21 इंच लांबीची धारदार तलवारीस त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गांव व पत्ता विचारले असता सनी ऊर्फ सोनु लालचंद मुंगसे (वय 22 वर्ष, रा. मल्लाव गल्ली, न्यू पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. त्यास तलवार घेवून फिरण्याचे कारण विचारले असता काहीएक समाधान कारक उत्तर दिले नाही. त्याच्या विरुध्द पोलीस ठाणे बेगमपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय.) अपर्णा गिते व सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संदीप गुरमे, पोलीस उप निरीक्षक प्रविण वाघ, व पोलीस अंमलदार योगेश नवसारे, विजय भानुसे, विजय घुगे, नितीन देशमुख, काकासाहेब आधाने, कैलास काकड, अश्वलिंग होनराव (सर्व नेमणुक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर) यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!