छत्रपती संभाजीनगर

मराठा, कुणबी समाजासाठी महत्त्वाची बातमी: सारथी संस्थेमार्फत शेतकरी उत्पादक कंपनी सभासदासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण योजना ! निवडीचे निकष, अर्ज प्रक्रिया, प्रशिक्षणाचे ठिकाण घ्या जाणून !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. 12 -: शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्या उत्पादित मालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करणे ही शेती क्षेत्रापुढील जेटील समस्या आहे. या करिता शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीचे मार्गदर्शन व त्याआधारे निविष्ठा पुरवठा करणे, उत्पादित मालाची विपणन व्यवस्था विकसित करणे, नाशवंत शेतमालाचे प्रक्रियाकृत मालामध्ये रूपांतर करणे व कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे या उद्देशाने सन 2011 – 2012 पासून राज्यात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करण्याची चळवळ मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे. शेतमालाच्या योग्य दर मिळावा शेतमाला प्रक्रिया उद्योग वाढावेत व शेतमालाची एकत्रित व प्रक्रियायुक्त शेतमालाचे ब्रँडनेस विकसित होऊन शेती किफायतशी व्हावी, सद्यस्थितीत राज्यात नाबार्ड, एस. एफ.ए.सी. किंवा स्वतः काही शेतकऱ्यांनी मिळून सुमारे 6500 पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केलेल्या आहेत.

त्यापैकी फक्त 16 टक्के ( 1040) शेतकरी उत्पादक कंपनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत असल्याचे निदर्शनास येते, उर्वरित कंपनीचे कामकाज जेमतेम चालु असून अनेक कंपन्या बंद स्थितीत आहेत. राज्यात 1250 शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकरी सभासद संख्या 250 पेक्षा जास्त आहे. शासनाचा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचा मुख्य उद्देश लहान व मध्यम शेतकऱ्यांचा आर्थिक उन्नतीसाठी काम करणे हा होता.

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केल्यानंतर कंपनीचे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संघटितपणे प्रयत्न केल्यास या संस्थेचे चांगल्या प्रकारे काम करू शकतात असे राज्याचे अनेक शेतकरी उत्पादक कंपनींना सिद्ध केलेले आहे. त्यांच्या स्थापनेपासून कंपनीचे वाटचाल कशी असावी याचे अचूक मार्गदर्शन नाबार्ड, महाराष्ट्र स्पर्धात्मक विकास प्रकल्प किंवा इतर संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी मिळत आहे.

राज्यात स्थापन झालेल्या अनेक कंपनीच्या शास्त्रोक्त मार्गदर्शनापासून वंचित आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यांना शास्रस्त्रोत मार्गदर्शनाची मोठी गरज आहे. ही गरज ओळखून पुढाकार घेऊन समक्ष व शाश्वत कंपनी चालविण्यासाठी प्रशिक्षणाची सुविधा छत्रपती शाहू महाराज संस्था प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) पुणे यांनी उपलब्ध केलेली आहे. सारथी ही संस्था राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा कुणबी या लक्षीत गटातील समाजाची सामाजिक शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे. शेतकरी केंद्र बिंदू मानून शेतकरी कंपनीच्या लक्षीत गटातील संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रतिनिधीक सभासद यांच्यासाठी विनाशुल्क क्षमता बांधणी पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम योजना सन 2023-24 साठी घोषित केला आहे.

या संस्थेमार्फत योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्याशी सहकार्य करार (MoU) केलेला आहे. सदर संस्था सहकारी संस्था व शेतकरी उत्पादन कंपनी यांचे बळकटीकरण व सक्षमीकरणाचे काम राज्यात करीत आहे. यासाठी संस्थेकडे प्रशिक्षण राबविण्याचा अनुभव व तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे.

योजना- सारथी लक्षीत गटातील (मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा कुणबी ) शेतकरी उत्पादक कंपनी संचालक, सभासद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाच दिवशीय निवासी प्रशिक्षणाची विनाशुल्क प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी कंपनीशी निगडी विविध विषयातज्ज्ञाचे मार्गदर्शन, प्रशिक्षण, साहित्य, चहा, नाष्टा, भोजन, निवास, क्षेत्रीय भेट व प्रमाणपत्र इत्यादी बाबींचा समावेश आहे.

योजनेचे उद्दिष्ट व समाविष्ट विषयक

· शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट याचे आदर्श व्यवस्थापन करणे कसे करावे.

· शेतकरी उत्पादक कंपनींना वित्त पुरवठा वैज्ञानिक प्रतिपूर्ती, कंपनीचे वित्तीय नियोजन व व्यवस्थापन विकास आराखडा तयार करणे.

· कृषी माल निर्यातीमध्ये शेतकरी उत्पादक कंपनींना वाव, संधी व कार्यप्रणाली.

· शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सभासदांना शाश्वत निविष्ठ पुरवठा.

· बाजाराची गतिशीलता समजावुन घेणे.

· शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून शेतमालाची ऑनलाईन विक्री व्यवस्था.

· कृषी मालाचे विपणन, साठवणूक, प्रक्रिया, मूल्यवर्धन, मूल्यसाखळी तयार करणे.

· शेतकरी उत्पादन कंपनी सभासद संवाद, प्रशासन व लेखाकर्म.

· व्यावसायिक जोखीम व वित्तीय व्यवस्थापन.

· केंद्र व राज्य पुरस्कृत शेतकरी उत्पादनक कंपनीसाठी विविध योजना.

· शेतकरी उत्पादन कंपनी सक्षम व्हावे,ती शाश्वत चालावी व त्यामध्ये शेतकऱ्यांना सक्रिय सहभाग असावा यासाठी सारखी संस्थेमार्फत सन 2023 24 या आर्थिक वर्षासाठी वरील उद्दिष्ट्यांच्या आधारे योजना कार्यान्वित केलेली आहे.

निवडीचे निकष

· शेतकरी उत्पादन कंपनी सभासद हे महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

· प्रशिक्षणासाठी पात्र व्यक्ती ही मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा कुणबी या लक्षीत गटातील असावी व शेतकरी उत्पादन कंपनीची सभासद असावी.

· प्रशिक्षणासाठी पात्र लक्षीत गटातील व्यक्ती आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय (EWS), नॉन क्रिमिलीयर गटातील असावी. अथवा सदर सभासद शेतकऱ्यांचे मागील 3 वर्षोचे वार्षीक उतपन्न हे रुपये आठ लाखापेक्षा जास्त नसावे. याबाबत संबधित तहसीलदार यांच्या उत्पादनाचा दाखला असावा उत्पादक कंपनीची कंपनी कायदा 2013 नुसार Register of Company (RoC ) कडे नोंदणी झालेले असावी.

· कंपनीच्या भागधारकांची संख्या 50 पेक्षा कमी नसावी.

· शेतकरी हा नाबार्ड किंवा इतर शासकीय योजनेद्वारे प्रशिक्षणासाठी अनुदान प्राप्त शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद नसावा.

· एका कंपनीतील जास्तीत जास्त पाच व्यक्ती प्रशिक्षणासाठी सहभागी होऊ शकतात.

अर्ज प्रक्रिया- प्रशिक्षणासाठी विविध नमुन्यातील ऑनलाईन अर्ज www.sarthi-maharashtragov.com व www.mahamcdc.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे.

प्रशिक्षणार्थी निवड- शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे प्राप्त अर्जापैकी मूल्यांकनाद्वारे अधिक गुणांक प्राप्त करणाऱ्या राज्यातील फक्त प्रथम 192 शेतकरी उत्पादक कंपनीचे लक्षीत गटातील संचालक, सभासद, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सन 23 -24 मध्ये प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाचे ठिकाण- पुणे, नाशिक, औरंगाबाद ,अमरावती, वर्धा, नागपूर, दापोली जिल्हा रत्नागिरी.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनींना पुढे दोन वर्षे निशुल्क मार्गदर्शन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मार्फत करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधितांना व्यवसायिक संधी उपलब्ध करून देणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, निविष्ठा पुरवठा, मार्केट लिंकेजेसस, इक्विटी ग्रॅन्ट, प्रोपोझल, शेतकरी उत्पादक कंपनी निगडीत योजना, बँक व वित्तीय संस्थांकडून निधी उपलब्धता, शतकरी उत्पादक कंपनीशी निगडीत शासकीय अधिकारी इतर स्टेक होल्डर यांच्या मध्ये समन्वय साधने इत्यादी सेवा पुरविण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास या संस्थांना कलारूप विविध नावांनी पूर्ण विषयाची पुन्हा पुढील आर्थिक वर्षात शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रगतीच्या आधारे प्रशिक्षणाच्या अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या वतीने या योजनेच्या अधिकाअधिक लाभ शेतकरी उत्पादक कंपनींनी द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!