छत्रपती संभाजीनगरपैठण
Trending

अंबडच्या युवकास आडूळ शिवारात लुटणारे पैठण तालुक्यातील चोरटे जेरबंद ! हर्सूल जकात नाका परिसरातून सापळा लावून ठोकल्या बेड्या !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ -: बीड ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील आडूळ शिवारात रस्त्याने जाणा-या अंबडच्या दुचाकीस्वारास लुटणारे आरोपी स्थानिक गुन्हेशाखे कडून २४ तासांत जेरबंद करण्यात आले. जकात नाका हर्सूल परिसरात दडून बसलेल्या आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी सापळा लावून आवळल्या.

१) सुदर्शन नंदू पांढरे वय २८ वर्षे रा.आडूळ ता. पैठण २) सागर भाऊसाहेब वाघ वय २८ वर्षे रा.आडूळ अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस ठाणे पाचोड येथे फिर्यादी शेख रफिक शेख बाबूलाल (वय ३२ वर्षे रा. अंबड जि.जालना) यांनी दिनांक ०२/१२/२०२३ रोजी पोलिसांत तक्रार दिली की, ते दिनांक ०२/१२/२३ रोजी दूपारी ११.१५ वाजता त्यांच्या मोटारसायकलवर संभाजीनगर येथे जात होते. आडूळ बायपास येथे अनोळखी चार जणांनी फिर्यादी शेख रफिक यांची मोटारसायकल अडवली. चाकूचा धाक दाखवून फिर्यादी शेख रफिक यांच्या खिशातील ४३००/- रुपये बळजबरीने हिसकावून पसार झाले. या तक्रारीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश वाघ, पोलिस निरीक्षक स्था. गु.शा यांनी दरोडा जबरी चोरी पथकासह घटनास्थळाची पाहणी करून सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असताना पोलिस निरीक्षक स्था.गु.शा सतीश वाघ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सुदर्शन पांढरे (रा. आडूळ) याने त्याच्या इतर साथीदारासह केला असून तो जकात नाका हर्सूल परिसरात लपून बसला आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

या माहितीच्या ठिकाणी पोलिस पथकाने सापळा लावून आरोपी १) सुदर्शन नंदू पांढरे वय २८ वर्षे रा. आडूळ ता. पैठण यास शिताफिने ताब्यात घेवून त्यास गुन्हयासंदर्भात विचारपूस करता सदरचा गुन्हा हा त्याने त्याच्या इतर साथीदारासह केल्याची कबुली दिली. यावरून आरोपी १) सुदर्शन नंदू पांढरे वय २८ वर्षे रा.आडूळ ता. पैठण २) सागर भाऊसाहेब वाघ वय २८ वर्षे रा.आडूळ यांना या गुन्हयात अटक करून पुढील कारवाई करीता पाचोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पाचोड पोलिस करत आहे.

ही कामगीरी पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, पो.उप.नि. भगतसिंग दुलत, पोलिस अंमलदार नामदेव सिरसाठ, दिपेश नागझरे, संजय घुगे, वाल्मिक निकम अशोक वाघ, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!