महाराष्ट्र
Trending

बदनापूर महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञानास सिडको बसस्टॅंडमध्ये लुटले ! म.रा.वि.म. कार्यालयात कर्मचारी पथसंथेचे मतदान करून घरी परतताना चोरट्यांनी डाव साधला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४- बदनापूर महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञानास सिडको बसस्टॅंडमध्ये लुटले. छत्रपती संभाजीनगर येथील म.रा.वि.म. कार्यालयात कर्मचारी पथसंथेचे मतदान करून घरी परतण्यासाठी सिडको बसस्टॅंडमध्ये असताना चोरट्यांनी हा डाव साधला.

अप्पासाहेब पांडुरंग दाभाडे (वय-35 वर्षे व्यसाय-सराकारी नोकरी रा. धोपटेश्वर ता. बदनापुर जि. जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, ते महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालय बदनापूर येथे वरीष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करतात. दि. 03/12/2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील मिल कॉर्नर जवळील म.रा.वि.म. कार्यालयात कर्मचारी पथसंथेचे मतदान असल्याने वरिष्ठ तंत्रज्ञ अप्पासाहेब दाभाडे हे छत्रपती संभाजीनगर येथे आले होते.

मतदान संपल्यानंतर संध्याकाळी 07:00 वाजता बदनापूर येथे घरी जाण्यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ अप्पासाहेब दाभाडे हे सिडको बसस्टँड जवळील उड्डाण पुलाजवळील जालना रोड वरील बसस्थानक येथे बसले होते. त्यानंतर 07:20 वाजता एक जण आला तो म्हणाला की, “तुला कुठे जायचे आहे. तेथे मी तुला सोडतो” असे म्हणाला व त्याने अचानक वरिष्ठ तंत्रज्ञ अप्पासाहेब दाभाडे यांच्या शर्टाची कॉलर पकडली व खिशातील मोबाईल हिसकावून घेतला.

त्याच वेळी आणखी एक जण तेथे आला व त्याने खिशातील पाकीट हिसकावून घेतले. व त्यानंतर एक जण दुचाकीवर आला व त्यावर बसून चोरटे पळून गेले. मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 8,600 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. याप्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ अप्पासाहेब दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआईडीसी सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!