विनायकराव पाटील कॉलेजचे सेवानिवृ्त प्राध्यापक आण्णासाहेब थेटे मृत्यू प्रकरणास वेगळे वळण ! सूसाईड नोटवरून खळबळ, पत्नी व मुलीवर वैजापूर पोलिसांत गुन्हा !!
पेन्शन व जमिनीच्या हिश्श्यावरू ब्लॅकमेलला कंटाळून आत्महत्या केल्याचा एका पत्नीचा दावा
संभाजीनगर लाईव्ह, दि. १५ – विनायकराव पाटील कॉलेजचे सेवानिवृ्त प्राध्यापक आण्णासाहेब थेटे यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. थेटे यांनी पहिल्या पत्नीच्या व मुलीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद असल्याचा दावा करत दुसऱ्या पत्नीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहे. पेन्शन व जमिनीच्या हिश्श्यावरू ब्लॅकमेलला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथम माहिती अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आण्णासाहेब नाथा थेटे (वय 60 रा. जीवनगंगा सोसायटी समोर, रामेश्वर कॉलनी, स्टेशन रोड, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिनांक 24/05/2023 रोजी आत्महत्या केली होती. दोन मजली राहत्या घराच्या लिफ्टला बेडशीटचे साहायाने गळफास लावून आत्महत्या केली होती.
यासंदर्भात दुसऱ्या पत्नीने प्रथम महिती अहवालात दिलेल्या माहितीनुसार पती आण्णासाहेब थेटे (मयत ) हे विनायकराव पाटील कॉलेज येथे प्राध्यापक म्हणुन नोकरीस होते. परंतु त्यांनी मार्च 2022 मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांची पहिली पत्नी व मुलगी यांच्यासोबत सेवानिवृत्ती पेन्शनच्या पैशांबाबत कोर्टात दिवाणी वाद चालू होता. तसेच आण्णासाहेब थेटे यांचे प्रॉपटीचे हिस्सेवरून नेहमी वाद होत होते. अण्णासाहेबांचे दुसरे लग्न सन 2013 मध्ये झाले. दुसरे लग्न पहिल्या पत्नीच्या संमतीने झाल्याचा दावा दुसऱ्या पत्नीने प्रथम माहिती अहवालात केला आहे.
लग्नानंतर 3-4 वर्षे दोघींसह अण्णासाहेब एकत्रित राहिले. सन 2016 मध्ये आण्णासाहेब यांनी पहिल्या पत्नीस दुसरे घर घेवून दिल्याने ती वेगळी राहत होती. दरम्यान, दिनांक 24/05/2023 रोजी सकाळी 07.00 वाजेच्या सुमारास दुसरी पत्नी ओळखीच्या दहाव्याचा कार्यक्रमास गेल्या. दहाव्याच्या कायक्रमासाठी त्या एकट्याच गेल्या. तेव्हा आण्णासाहेब थेटे हे घरीच होते. दरम्यान, दहाव्याच्या कार्यक्रमात कीर्तन सुरु असताना सुमारे 10.45 वाजता दुसऱ्या पत्नीला माहिती मिळाली की, आण्णासाहेब थिटे यांनी लिफ्टला बांधून घेतले आहे.
ही माहिती मिळताच दुसऱ्या पत्नीने लगेच घरी येवून पाहिले असता आण्णासाहेब यांना गाडीत टाकून डोंगरे हॉस्पिटल, वैजापूर येथे घेवून जात होते. त्यांची दुसरी पत्नीही लगोलग त्यांच्या पाठीमागे गेली. डोंगरे हॉस्पिटल येथे डॉक्टरांनी आण्णासाहेब यांना तपासून तुम्ही यांना सरकारी दवाखाना, वैजापूर येथे घेवून जाण्यास सांगितले. दरम्यान, तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी दुसऱ्या पत्नीला घरी पाठवून दिले. नंतर काही वेळाने माहिती मिळाली की, आण्णासाहेब यांनी आपल्या घराच्या लिफ्टला गळफास घेतला होता आणि त्यांना आता सरकारी दवाखाना, वैजापूर येथे आणले.
तेव्हा डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे. आण्णासोब थेटे यांच्या पॅन्टच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे व त्यामध्ये त्यांनी त्यांची पहिली पत्नी व मुलगी यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, असे त्या चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. दिनांक 24/05/2023 रोजी आण्णासाहेब थेटे यांचा अतविधीचा कार्यक्रम आटोपून दुसरी पत्नी घरी आल्या तेव्हा पोलिस पंचनामा करण्यासाठी घरी आले. त्यांना मोटार स्कूलच्या ऑफिसमधील आण्णासाहेब थेटे यांच्या फाईलमध्ये आणखी एका पांढऱ्या कागदावर लिहीलेली चिठ्ठी मिळाली. ती चिठ्ठी दुसऱ्या पत्नी यांना दाखविली असता त्यावर दिनांक 14/3/2022 माझी पत्नी ही मला ब्लॅकमेल करत असून पोलीस केसच्या धमक्या देऊन मला मानिसक त्रास देत आहे.
त्यामुळे माझ्या जीवितास काही झाल्यास सर्वस्वी जबाबदार पत्नी व मुलगी असतील. तरी मी आत्महत्या केल्यास यांच्यावर कार्यवाही करावी ही शेवटची विनंती. शेवटी इंग्रजीमध्ये सही व त्याखाली आण्णा नाथा थेटे असे लिहीलेली चिठ्ठी होती. तसेच गळफास घेताना त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवर देखील पत्नी व मुलीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे असे लिहिले होते, असे दुसऱ्या पत्नीने प्रथम माहिती अहवालात नमूद केले आहे.
याप्रकरणी दुसऱ्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पहिल्या पत्नीवर व मुलीवर वैजापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe