नवीन शिक्षक भरतीपूर्वी केंद्रप्रमुख, पदवीधर पदोन्नती करा ! विभागीय आयुक्तांच्या निर्देशाचे काय झाले ? जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा कानाडोळा !!
आदर्श शिक्षक समितीची मागणी
संभाजीनगर लाईव्ह, दि. ८- नवीन शिक्षक भरतीपूर्वी केंद्रप्रमुख, पदवीधर पदोन्नती करा अशी मागणी आदर्श शिक्षक समितीने केली आहे. दरम्यान, जूनमध्ये विभागीय आयुक्तांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात दिलेले निर्देशाची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अद्याप केली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे महत्वाचे विविध प्रश्न वर्षांनुवर्षे जिल्हा परिषद स्तरांवर प्रलंबित होते, प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून सातत्याने आदर्श शिक्षक समिती व शिक्षक परिषद संघटनेच्या वतीने जिप कडे व विभागीय आयुक्त यांच्याकडे मार्च २०२२ पासून पाठपुरावा करून मागण्या लावून धरण्यात आल्या असता विभागीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक व निवडश्रेणी तीन प्रश्नांची सोडवणूक झाली. मात्र जिल्ह्यात शेकडो शाळेवर गणित- विज्ञानाच्या पदवीधर शिक्षकांची सुमारे 350 पदे रिक्त आहे, तर अद्यापही मुख्याध्यापक ची 80 पदे रिक्त आहेत.
याचबरोबर केंद्रप्रमुख पदोन्नतीचे 40 पदे रिक्त आहेत. मे महिन्यात सर्व पदोन्नतीच्या प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र विलंब होत गेल्याने संघटनेने आयुक्तांना भेटून निवेदन दिले असता आयुक्तांनी जिप शिक्षण अधिकारी व संघटना प्रतिनिधी सोबत 5 जून रोजी आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत जुलै 15 तारीख पर्यंत पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख पदोन्नती करण्यात येईल असे आश्वासन शिक्षण अधिकारी यांनी आयुक्त व संघटनांना दिले होते. याबाबत आयुक्तांनी जिल्हा परिषदेला १३ जून रोजीच पत्र देऊन कालबद्ध पध्दतीने तात्काळ प्रलंबित प्रश्न सोडवावे असे निर्देश दिलेले आहेत व शिक्षक कर्मचारी कल्याण निधी जमा रक्कमेचा उप मुख्यकार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा अधिकारी यांनी संयुक्त चौकशी करून अवहाल मागितला आहे.
महिना उलटला तरीही प्रलंबित महत्वाच्या प्रश्नांबाबत जिल्हा परिषदेकडून कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नसल्याने केंद्रप्रमुख पदोन्नती पात्र शिक्षक व पदवीधर पदोन्नती पात्र शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त आहे. आयुक्तांच्या बैठकीत दिलेला शब्द या महिन्यात जिल्हा परिषदेने पूर्ण करावा अशी मागणी आदर्श शिक्षक समितीच्या वतीने संस्थापक दिलीप ढाकणे , राज्यसरचिटणीस अंजुम पठाण , जिल्हा अध्यक्ष संतोष बरबंडे, किशोर बिडवे, शिवाजी एरंडे, संजीव देवरे, संतोष जाधव, किशोर पवार, बाबूलाल राठोड, ज्ञानेश्वर पठाडे, राजेश आचारी, बाबासाहेब सांगळे, दिनेश शंक, शांताराम तोरणमल, नितीन भागवत, दिनेश साळवे, अविनाश तिबोले, अनिल विचवे,सोमनाथ रासकर, अनिल सोनवणे, कृष्णा घुगे, बाबासाहेब सांगळे, नजीर शेख, भरत सदभावें , संतोष कवडे, मनोहर पठे, विष्णू गाडेकर, पवन दौड, मनोहर लबडे, राजू बाविस्कर , नानासाहेब शिंदे , प्रदीप नावाडे, अनिल मोरगे, महिला आघाडी च्या सुषमा राऊतमारे, पुष्पा दौड, बबिता नर वटे, सुनंदा बनसोडे, सुरेखा पाथरीकर, योगिता गोरे, जयश्री बनकर , पद्मा वायकोस, अलका झरवाल, छाया वालतुरे, स्मिता जोशी, उजवला क्षीरसागर , भारती सॊळुंके, जयश्री दहिफळे, गीतांजली गजबे ,सुनीता कुलकर्णी, रेखा भोसले, अनिता भटकर, आदीने केली आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe