छत्रपती संभाजीनगर
Trending

रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी महिलेवर दबाव, क्रांतीचौकातील हॉटेलजवळ गाठून अश्लिल शिवीगाळ !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – रिलेशनमध्ये राहण्यासाठी महिलेवर दबाव टाकत तिचा माग धरत हॉटेलजवळ अश्लिल शिवीगाळ केली. ही घटना १२ जून रोजी रात्री १०.३२ वाजता हॉटेल मॅनोर, क्रांतीचौकजवळ छत्रपती संभाजीनगर येथे घडली.

याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून 1) यशराज रामटेके (रा. सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर), 2) सोहेल पटेल, 3) सचिन इंगळे (4) महिला यांच्यावर वेदांतनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे असून आरोपी हे फिर्यादी यांनी आरोपी क्र. 2 याच्या सोबत रिलेशन शिपमध्ये यावे म्हणुन वेळो वेळी दबाव टाकले. आरोपीतांनी फिर्यादीचा माग धरत हॉटेल मॅनौर येथे आले व आरोपी क्र. 1,2,3 यांनी हॉटेलच्या काउंटर जवळ जाऊन फिर्यादी बाबत विचारपुस करून त्यांनी फिर्यादी हे मॅनेजर असल्याचे त्यांना सांगितल्यावर आरोपी क्र. 1 याने अश्लिल शिवीगाळ केली.

तसेच आरोपी क्र. 1 हा फिर्यादीस नेहमी वेगवेगळ्या अनोळखी नंबर वरुन फोन करुन मानसिक त्रास देतो व रिलेशन मध्ये राहण्यासाठी दबाव आणतो. व नेहमी पाठलाग करतो. आरोपी क्र. 1 व 4 देखील फिर्यादीस आरोपी क्र. 1 सोबत रिलेशनमध्ये येण्यासाठी दवाव आणत राहतात म्हणून फिर्यादी यांनी पोलीस ठाणेला येवून तक्रार दिली.

महिलेच्या या फिर्यादीवरून वेदांतनगर पोलिस स्टेशनमध्ये गुरन ११४/२०२३ कलम ३५४ ड, २९४, ३४ भादवी प्रमाणे चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि कैलास जाधव हे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!