वाळूज MIDC : साई उद्योगनगरीतील प्रेस मशीनमध्ये कामगाराचा हात अडकून तीन बोटे तुटली, कंपनी मालकावर गुन्हा !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – प्रेस मशीमध्ये उजवा हात अडकून कामगाराची तीन बोटे तुटल्याची घटना साई उद्योगनगरी वाळूज एमआयडीसी (छत्रपती संभाजीनगर) येथे घडली. याप्रकरणी कामगाराने दिलेल्या तक्रारीवरून कंपनीमालक योगेश्वर श्रीनिवास यांच्यावर एम वाळूज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामु कल्लु राजपुत (वय 18 वर्षे, धंदा- खा.नोकरी, रा.पाथरकछार, ता.मजगाव, जि. सतना, राज्य मध्य प्रदेश ह.मु. योगेश्वर इंटरप्रेस प्लाट नं.33 साई उद्योग नगरी, वाळुज midc, ता.जि.छत्रपती संभाजीनगर) असे जखमी युवकाचे नाव आहे.
रामु राजपुत याने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, दिनांक 01/08/2023 रोजी सकाळी 07.00 वाजेच्या सुमारास रामु राजपुत याच्याकडे योगेश्वर इंटरप्रेस प्लाट नं.33 साई उद्दोग नगरी वाळुज mide छत्रपती संभाजीनगर या कंपनीत नोकरी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तांत्रिक शिक्षण नसताना त्याला नोकरीवर ठेवले होते.
सदर कंपनीत काम करीत असतांना प्रशिक्षित कामगार नेमणे, कामगारास औद्योगिक सुरक्षा पुरविणे, मशिन सुस्थितीत ठेवणे व देखभाल करणे इ. कामे करणे बंधनकारक असताना रामु राजपुत याला काम करण्यास भाग पाडले. त्यामुळे कंपनीत काम करीत असतांना रात्री 09-00 वाजेच्या सुमारास प्रेस मशीनमध्ये रामु राजपुतच्या उजव्या हाताची बोटे अडकल्याने तीन बोटे तुटुन गंभीर दुखापत झाली.
ही दुखापत होण्यास कंपनीमालक योगेश्वर श्रीनिवास हे कारणीभुत असून त्यांनी यंत्रसामुग्री बाबत बेदरकारपणे तसेच हयगयीने वर्तन करुन सुरक्षितता धोक्यात आणनारे काम करण्यास भाग पाडल्याचे रामु राजपुत याने फिर्यादीत नमूद केल्या आहे. याप्रकरणी जखमी कामगार रामु राजपुत याने दिलेल्या फिर्यादीवरून साई उद्योगनगरी कंपनीचे मालक योगेश्वर श्रीनिवास यांच्यावर एम वाळूज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि अशोक इंगोले करीत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe