विद्यापीठातील कर्मचाऱ्याकडून व्हॉटस्अप व्हिडीओ कॉल, पाठलाग करून महिलेला त्रास !
एन.एस.एस. कॅम्पच्या तयारीसाठी गेलेल्या महिलेचा नंबर मिळवून वारंवार पाठलाग
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – एन.एस.एस. कॅम्पच्या तयारीसाठी गेलेल्या महिलेचा नंबर मिळवून वारंवार पाठलाग केला. व्हॉटस्अप व्हिडीओ कॉल करून महिलेला त्रास दिल्याची तक्रार क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. सुरुवातीला विद्यापीठात तक्रार देण्यात आली होती आणि आता पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नजिम पटेल असे आरोपीचे नाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ एन.एस.एस. विभागात तो कर्मचारी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यातील महिला फिर्यादी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे एन.एस.एस. कॅम्पच्या तयारी साठी गेलेली आसतांना फिर्यादीचा मोबाईल नंबर घेऊन आरोपीने तिचा वारंवार पाठलाग केला. व्हॉटस्अप व्हिडीओ कॉल करून फिर्यादीचा पाठलाग केला. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करुन मा. पो नि सो आदेशाने पुढील तपासकामी पोउपनि तनपुरे यांचेकडे दिला आहे. 245/2024
कलम 354 ड भादवी नुसार क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe