महाराष्ट्र
Trending

अ‍ॅपेरिक्षा चालकाने हुलकावणी दिल्याने मोटारसायकलवरून खाली पडून महिलेचा मृत्यू ! बदनापूरजवळील शेलगाव येथील दुर्घटना !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २१- भरधाव अ‍ॅपेरिक्षा चालकाने हुलकावणी दिल्याने मोटारसायकलवरून खाली पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे घडली. जखमी महिलेला घाटीत दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवर ही घटना घडली.

लालू संग्राम काटमोडे (वय 46 वर्षे ,रा. एस. एस. कुलथे, शिगणेनगर वार्ड नं. 12 देऊळगाव राजा ता. देऊळगावराजा जि. बुलढाणा) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, ते पंचायत समिती देऊळगाव राजा येथे विषय तज्ञ म्हणुन तात्पुरत्या स्वरुपात नोकरी करतात. दि. 02/10/2023 रोजी दुपारी 03.00 वाजेच्या सुमारस लालू काटमोडे व त्यांची पत्नी पंचशीला लालू काटमोडे व दोन मुले साडुचे छत्रपती संभाजीनगर येथील घरून गावी मौजे देऊळगाव राजा येथे जाण्यास निघाले.

छत्रपती संभाजीनगर ते जालना हायवे रोडने मोटारसायकलने गावाकडे परतत असताना शेलगावजवळील महालक्ष्मी पेट्रोलपंप समोर संध्याकाळी 05.00 वाजेच्या सुमारास अज्ञात अॅपेरिक्षा चालकाने त्यांच्या ताब्यातील अॅपेरिक्षा भरधाव वेगात व निष्काळजीपणाने चालवून मोटारसायकलला पाठीमागून ओव्हरटेक करत हुलकावनी दिली. यामुळे पंचशीला काटमोडे या मोटारसायकलवरून रोडवर खाली पडल्या व त्यांच्या डोक्याला मार लागून गंभीर जख्मी झाल्या.

सदर अँपेरिक्षा चालक हा तेथे न थांबता तेथून निघून गेला. नंतर जखमी पंचशीला काटमोडे यांना खाजगी वाहनाने घाटी दवाखाना छत्रपती संभाजीनगर येथे दाखल केले. डोक्यास गंभीर जखम झालेली होती. उपचारादरम्यान पंचशीला काटमोडे यांचा मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी मूळ गावी देगलुर जि. नांदेड केला.

याप्रकरणी मृत महिलेचे पती लालू काटमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अॅपेरिक्षाचालकावर बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!