खुलताबादछत्रपती संभाजीनगर
Trending

म्हैसमाळ काशा तलावात इंदिरानगर गारखेड्याचा युवक बुडाला !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – म्हैसमाळ काशा तलावात इंदिरानगर गारखेडा परिसरातील युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, २२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.२० वाजता घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अरबाज सलीम पठाण (22, रा.इंदिरानगर गारखेडा, छत्रपती संभाजीनगर) असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पथक गेले असता पोलीसांनी सांगितले की पोहता येत नसताना तो युवक पाण्यात उतरला व बुडाला.

मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन केंद्र अधिकारी आर. के. सुरे, उप अग्निशमन केंद्र अधिकारी अब्दुल अजीज, मोहन मुगसे, ड्युटी ऑफीसर हरिभाऊ घुगे, लक्ष्मण कोल्हे, अग्निशामक जवान प्रसाद शिंदे, शशिकांत गीते, छगन सलामबाद, मयूर नरके, विजय पांडे, अक्षय नागरे, वाहन चालक सुभाष दुधे, दीपक वरठे या पथकाने घटनास्थळ गाठले. परंतू तोपर्यंत युवकाचा मृत्यू झाला होता.

Back to top button
error: Content is protected !!