छत्रपती संभाजीनगर
Trending

छत्रपती संभाजीनगरात आयटीआयच्या विद्यार्थ्याला लुटले ! गादिया विहार, पटरी जवळील मोकळ्या मैदानातून रनिंग करून परतताना चाकूचा धाकही दाखवला !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – गादिया विहार, पटरी जवळील मोकळ्या मैदानात रनिंग करून होस्टेलकडे परतणार्या आयटीआयच्या विद्यार्थ्याला दोघांनी मोबाईवर कॉल करण्याच्या बहाण्याने लुटले. लुटारूंकडे चाकू असल्याने विद्यार्थी घाबरला होता.

मनोहर पांडुरंग भिसे (वय 20 वर्ष, धंदा- शिक्षण, रा. चावडा कॉम्प्लेक्स वसतिगृह बीडबायपास रोड छत्रपती संभाजीनगर) याने पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, त्याचे शिक्षण सरकारी ITI कॉलेज, देवगिरी कॉलेजसमोर, छत्रपती संभाजीनगर येथे सुरू आहे. त्याचे मुळगाव रा. चोरंबा (बु) ता. हदगाव जि. नांदेड येथे आहे.

दि.07/04/2023 रोजी 18.30 वाजता मनोहर पांडुरंग भिसे हा शिवनगर, गादिया विहार, पटरी जवळील मोकळ्या मैदानात (छत्रपती संभाजीनगर) रनिंग साठी गेला होता. रनिंग पूर्ण करून परत हॉस्टेलवर जात असताना तेथे दोन अनोळखी तरुण आले. त्यांच्यापैकी पहिला एकजण मनोहर पांडुरंग भिसे यास म्हणाला की, त्याला एक कॉल करायचा आहे लावून दे.

त्याचेसोबत असलेल्या दुसऱ्या मुलाने मनोहरला नंबर सांगितला. तो मनोहरने त्याच्या मोबाइलवरून डायल केला असता समोरुन रिंगचा आवाज आला. तेव्हा लगेच त्याने मनोहरचा मोबाइल हातातून हिसकावून घेतला व त्याच्या सोबत असलेल्या पहिल्या मुलाने त्याच्याकडील चाकू दाखवला व दुसऱ्या मुलाने मनोहरच्या पॅन्टच्या खिशात हात घालून  एक हजार रुपये काढुन घेतले. मनोहरने त्यांना मोबाइल परत मागितला असता त्या दोघांनी मनोहला धक्का दिला व जा म्हणाले. त्यांच्याकडे चाकु असल्याने मनोहर खुप घाबरला व तेथून निघाला.

मनोहर पांडुरंग भिसे (वय 20 वर्ष, धंदा- शिक्षण, रा. चावडा कॉम्प्लेक्स वसतिगृह बीडबायपास रोड छत्रपती संभाजीनगर) याने दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!