छत्रपती संभाजीनगर
Trending

बेगमपुरा परिसरात युवकाचा चाकुने भोसकून खून ! खळबळजनक घटनेने छत्रपती संभाजीनगर हादरले !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – पूर्व वैमनस्यातून युवकाने दुसऱ्या युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरच्या बेगमपुरा भागात घडली.

विशाल शिंदे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तो १७ वर्षांचा होत. गणेश पटारे याने विशालचा खून केल्याचा आरोप आहे. खूनाची ही खळबळजनक घटना बेगमपुरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत माळीपाडा येथे घडली.

काही वर्षांपूर्वी आरोपी गणेश पटारे याच्या भावाला मृत विशाल शिंदे याने चाकूचा धाक दाखवून धमकावले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकारामुळे विशाल आणि गणेश या दोघांमध्ये खुन्नस होती. ते दोघे जेंव्हा जेंव्हा एकमेकांच्या आमने सामने आल्यावर खुन्नस देत असत.

दरम्यान, रात्रीच्या सुमारास विशाल शिंदे हा मित्रांसोबत चर्चा करत होता. याचवेळी तेथे गणेश पटारे आला. त्याच्या हातात चाकू होता. गणेश पटारे याने विशाल शिंदे याच्यावर चाकूहल्ला चढवला. या चाकु हल्ल्यात विशाल शिंदे हा गंभीर जखमी झाला.

गंभीर जखमी अवस्थेत त्याला नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी विशाल शिंदे यास मृत जाहीर केले. याप्रकरणी विशालच्या नातेवाईकांनी बेगमपुरा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गणेश पटारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून त्यात पुरावा मिळाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशाल शिंदेला गणेश पटारे मारहाण करत असल्याचे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याची प्राथमिक माहिती आहे. यानुसार पोलिस तपास करत आहे. या घटनेमुळे मात्र, बेगमपुरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

Back to top button
error: Content is protected !!