लातूर जिल्ह्यात गोळी झाडून युवकाचा खून ! भातखेड्यातील राहत्या घरात पांघरून टाकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – डोक्यात गोळी झाडून युवकाचा खून झाल्याची घटना लातूर जिल्ह्यातील मौजे भातखेडा येथे उघडकीस आली. खूनाचे नेमके कारण समोर आले नसून पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे. पोस्टमार्टममधून खूनाचा उलगडा झाला.
सूरज गोवींद मुळे (वय 25 वर्षे) असे मृत युवकाचे नाव आहे. लातूर जिल्ह्यातील मौजे भातखेडा येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला. डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्याने हा प्रकार उघडकीस आला.
सहा. पोलीस निरीक्षक प्रतिभा प्रभाकर ठाकूर (नेमणुक पोलीस ठाणे लातूर ग्रामीण) यांनी दिलेली माहिती अशी की, दि.07/02/2023 रोजी पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे हजर असताना माहिती मिळाली की, मौजे भातखेडा येथे सुरज गोवींद मुळे हा मृत झाला आहे. त्याच्या डोक्यास मार आहे असे फोन वरून पोलीस पाटील भालेराव यांनी कळवले.
यामुळे घटनास्थळी भेट देवून पाहणीसाठी पोलिस पथक निघाले. सफा / चौगुले, पोशी लामतुरे सरकारी जिपने सदर ठिकाणी 11.32 वाजता रवाना झाले. घटनास्थळी जावून पाहिले असता सूरज गोवींद मुळे (वय 25 वर्षे) हा त्याच्या घरी एका रूममध्ये मृत अवस्थेत आढळला. त्याच्या अंगावर पांघरून टाकलेले होते. पोलिसांनी दोन पंचासमक्ष पूर्ण पाहणी केली असता त्याच्या डोक्याच्या उजव्या बाजुस जखम दिसून आली.
पोलिसांनी ही माहिती तात्काळ वरीष्ठांना कळवून वरीष्ठांचे आदेशान्वये मृताचा पीएम करणे करीता सरकारी दवाखाना लातूर येथे घेवून गेले. दोन पंचासमक्ष मरणोत्तर पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृताचे वडील गोवींद रामकृष्ण मुळे (वय 51 वर्षे, शेती, रा. भातखेडा, ता. जि. लातूर) यांनी पोलीस स्टेशनला हजर होऊन खबर दिल्याने पोलिसांनी नोंद घेतली.
त्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. ए. डुडे यांनी सरकारी दवाखाना लातूर येथे सदर मृताचा पोस्टमार्टम केलेला प्राथमीक अहवाल हस्तगत केला. डोक्यामध्ये अग्निशस्त्राने गोळी लागून जखमी होवून रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याचा अभिप्राय दिला आहे. त्यानंतर सदर मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान, लातूर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये खूनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe