छत्रपती संभाजीनगर
Trending

झाल्टाफाटा सुंदरवाडी रेल्वे पुलाच्या पुढे पोलिसांच्या पेट्रोलिंग गाडीला कारने ठोकले ! मद्यधुंद चालकाने कार वाकडी तिकडी चालवून धडकवली !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – मध्यरात्रीच्या सुमारास इशारा देऊनही न थांबल्यामुळे पोलिसांनी पेट्रोलिंगच्या गाडीने पाठलाग सुरु केला. पाठलाग दरम्यान वाकडी- तिकडी चालणाऱ्या आय २० या कार चालकाने पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाडीला धडक दिली. ही घटना झाल्ट्याकडे जात असताना सुंदरवाडी येथील रेल्वे पुलाच्या पुढे दिनांक 08/07/2023 रोजी 01.40 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात कोणतीही जीवित हाणी झाली नसून सरकारी गाडीचे मात्र नुकसान झाले. कारचालकाने मद्य सेवन केले असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

यासंदर्भात सपोनि सुदाम धर्मराज शिरसाट (नेमणुक पोलीस ठाणे चिकलठाणा औरंगाबाद) यांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 07/02/2023 रोजी विभागीय गस्त पेट्रोलिंग असल्याने 23.43 वाजता सरकारी वाहन (क्र MH 12 TD 7841) सह चापोशि लोंढे पेट्रोलिंगसाठी रवाना झाले. दिनांक 08/07/2023 रोजी 01.40 वाजेच्या सुमारास पोलिस पेट्रोलिंगची गाडी झाल्ट्याकडे जात होती.

सुंदरवाडी येथील रेल्वे पुलाच्या पुढे जात असताना उजव्या बाजुला एक चारचाकी गाडी संशयितरित्या थांबलेली दिसली. पोलिसांनी त्यांना सरकारी वाहनाच्या पीए सिस्टीमवरुन विचारणा केली असता पांढर्या रंगाची आय २० कार (क्र MH 28 V6018) ही वाकडी-तिकडी वळणे घेत चालक गाडी चालवत होता.

त्यामुळे पोलिसांनी गाडी पलटवून घेत सदर कार चालक यांना थांबण्यास सांगितले. परंतु सदर कार चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगाने चालवून सरकारी वाहनाच्या डाव्या बाजुला धडक दिली. त्यानंतर पोलिसांनी कार वाहन थांबवून त्यातील चार जणांना बाहेर बोलावून घेतले. त्यांनी त्यांची नावे वाहनचालक ऋषीकेश भरत देशमुख (वय 27 वर्षे रा दुसरबीड ता सिंदखेडराजा जि बुलढाणा), अविनाश गौतम सपकाळ (28 वर्षे रा दहीदखुर्द ता जि बुलढाणा) हे दोघे दारुच्या नशेखाली असल्याचे दिसून आले. आम्हाला थांबवणारे तुम्ही कोण असा प्रतिप्रश्न विचारुन ते पोलिसांना अटकाव करत होते. तसेच गाडीच्या मागच्या सिटवर दोघे बसलेले होते.

दरम्यान, यासंदर्भात सपोनि सुदाम धर्मराज शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालक ऋषीकेश भरत देशमुख (वय 27 वर्षे रा दुसरबीड ता सिंदखेडराजा जि बुलढाणा), अविनाश गौतम सपकाळ (28 वर्षे रा दहीदखुर्द ता जि बुलढाणा) या दोघांवर चिकलठाणा पोलिस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!