छत्रपती संभाजीनगर
Trending

आला उन्हाळा: १ मार्च पासून अर्धा दिवस भरवा जिल्हा परिषदेच्या शाळा; आदर्श शिक्षक समितीचे सीईओंना साकडे !

वाढलेली उष्णता व पाणी टंचाईमुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास 

संभाजीनगर लाईव्ह, दि. २२ – वाढलेली उष्णता व पाणी टंचाईमुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होण्यास सुरुवात झाली आहे. यातच काही शाळा या पत्र्याच्या असल्याने उन्हाची, गर्मीची तिव्रता वाढली असून 1 मार्च 2023 पासून जिल्हा परिषदेच्या शाळा दररोज अर्धा दिवस भरवण्यात यावी, अशी मागणी आदर्श शिक्षक समितीने औरंगाबाद जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे केली आहे.

आदर्श शिक्षक समितीने औरंगाबाद जिल्हा परिषद सीईओंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद शाळा या ग्रामीण भागातील असल्याने सध्या उन्हाळ्याचे चटके बसू लागले आहेत, तसेच ग्रामीण भागात पाण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हामध्ये शाळेत ये जा करावी लागते परिणामी उन्हाची झळ विद्यार्थ्यांना लागू नये तसेच पाण्यासाठी अनेक अडचणींना मुख्याध्यापक शिक्षकांना सामोरे जावे लागते. बऱ्याच शाळा या पत्र्यांच्या असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना गरम होत असते त्याचप्रमाणे हवामान खात्याने सुद्धा तापमानवाढीचे संकेत दिलेले आहेत.

त्याचप्रमाणे आपली प्रशासकीय यंत्रणा केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांचा अहवाल घेऊन शाळा सकाळ सत्रात भरवाव्यात, अशी मागणी आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष बरबंडे, जिल्हा सरचिटणीस संजीव देवरे यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद सीईओंकडे केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!