
मुंबई, दि. 22 : युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुखमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, विद्यार्थ्यांना 2 मार्च 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुलामुलींना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देत त्यांच्यातील ऊर्जा, धाडस, कल्पकता आणि तंत्रज्ञानातील गती यांचा उपयोग करून प्रशासकीय प्रक्रियांना गती देणे, नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांनाही धोरण निर्मिती, नियोजन, कार्यक्रमां
मुख्यमंत्री फेलोशिप 2023 साठी अर्ज करण्यासाठी वय 21 ते 26 वर्षे, ६० टक्के गुणांसह पदवी व एक वर्षाचा कामाचा अनुभव असे किमान निकष आहेत. ऑनलाईन परीक्षा, निबंध व मुलाखत अशा त्रिस्तरीय चाचणीच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. आलेल्या अर्जांमधून 60 युवक मुख्यमंत्री फेलो म्हणून निवडले जातील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या विविध विभाग व राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये हे फेलो वर्षभर काम करतील.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर हे या कार्यक्रमाचे अकॅडेमिक पार्टनर आहेत. या दोन्ही संस्थांद्वारे सार्वजनिक धोरणासंबंधातील विविध विषयांचा अभ्यासक्रम फेलो पूर्ण करतील. त्यासाठी त्यांना आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांचेकडून स्वतंत्र पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र देण्यात येईल.
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची तपशीलवार माहिती http://mahades.