छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

हर्सूल टी पॉइंट ते हर्सूल पोलिस स्टेशन परिसरातील १५ अतिक्रमणावर जेसीबी फिरवला ! जेल प्रशासनाने पत्र दिल्यावर महानगरपालिकेला जाग !!

संभाजीनगर लाईव्ह, दि.११ – हर्सूल टी पॉईंट ते हर्सूल पोलीस स्टेशन रस्त्यावरील एकूण १५ रस्ता बाधित अतिक्रमणे आज काढून टाकण्यात आले. महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने राबवलेल्या या मोहीमेमुळे हर्सूल टी पॉईंट ते हर्सूल पोलिस स्टेशन या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथका मार्फत आज सकाळी दहा वाजेपासून हर्सूल कारागृह लगत सुरक्षा भिंतीलगत एकूण चार दहा बाय दहा या आकाराचे लाकडी शेड तयार करून त्या ठिकाणी चहा, फळ व इतर सर्व किरकोळ साहित्य विक्रीचे दुकाने काढण्यात आली होती. याबाबत पोलीस अधिक्षक हर्सूल कारागृह, पोलीस उपदेशक प्रशासन मध्यवर्ती कारागृह यांनी पत्र देऊन कळविले होते की हर्सूल कारागृह लगत काही नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे हर्सूल कारागृह सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

संबधिताविरुद्ध कारवाई करून कारागृह प्रशासनास सहकार्य करावे असे पत्र प्राप्त होते. याबाबत संबंधित लोकांना ऑगस्ट महिन्यात सूचना देऊन अतिक्रमण काढणे बाबत कळवले होते परंतु काही नागरिकांनी अतिक्रमण काढले व काही अतिक्रमणधारक हे प्रशासनाला जुमानत नव्हते म्हणून आज सकाळी सदर कारवाई जेसीबीच्या साह्याने करण्यात आली. पूर्ण शेड जमीनदोस्त करण्यात आले.

पुढे रस्त्यावर दोन लोखंडी टपऱ्या जप्त करण्यात आल्या. हर्सूल रोडला रस्त्यावर मटन चिकन यांची दुकाने थाटून ते रस्त्यावर शेड केले होते. त्यांचेही शेड निष्काशित करून साहित्य जप्त करण्यात आले. पुढे हर्सूल पोलिस स्टेशन लगत एका किराणा दुकानदारने वीस बाय पंधरा या आकाराचे रस्त्यावर शेड करून किराणा व्यवसाय सुरू केला होता. सदर ठिकाणी समोरील भाग काढून मागील भाग स्वतः काढण्याबाबत कळविले आहे. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हर्सूल या ठिकाणी दहा बाय पंधराचे अतिक्रमण काढण्यात आले.

यानंतर हर्सूल टी पॉइंट ते सिडको बस स्टॅन्ड येथील एकूण चार टपऱ्या हटविण्यात आल्या व सर्विस रस्ता कामाविषयी  अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी प्रत्यक्ष ठिकाणी नागरिकांशी चर्चा केली व त्यांना रस्ताच्या कामात अडथळा आणू नये याबाबत सूचना दिल्या व त्या सर्व लोकांची सुनावणी सोमवारी सायंकाळी चार वाजता अतिरिक्त आयुक्त यांच्या उपस्थतीमध्ये ठेवण्यात आली आहे.

आजची कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अतिक्रम विभाग सविता सोनवणे यांच्या उपस्थितीत सहाय्यक आयुक्त अशोक गिरी अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, रामेश्वर सुरासे आणि हर्सूल पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी यावेळी बंदोबस्त देऊन सहकार्य केले.

Back to top button
error: Content is protected !!