महाराष्ट्र
Trending

वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी यांना १८ हजार ५०० तर सहाय्यक कामगारांना १२ हजार ५०० रुपये बोनस जाहीर !

मुंबई, दि. ९- वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी यांना १८ हजार ५०० तर सहाय्यक कामगारांना १२ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान/ बोनस जाहीर करण्यात आला आहे. प्रधान ऊर्जा सचिवर व व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ७४,८४४ अधिकारी,अभिंयते व कर्मचारी, व ३९०९ सहाय्यक कर्मचारी व ट्रेनी अभियंते २३ यांना सन २०२२-२०२३ चा बोनस दिवाळीपूर्वी देण्यात यावे ही मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेसह वीज उद्योगातील सर्वच कामगार संघटनांनी ऊर्जामंत्री व तिन्ही वीज कंपन्यांचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे केली होती.

दिंनाक ०८-११-२०२३ रोजी आभा शुक्ला, प्रधान ऊर्जा सचिव व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये लोकेश चंद्र, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महावितरण कंपनी, संजय कुमार अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महापारेषण कंपनी, डॉ.पी.अनबलगम अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती कंपनी, संचालक वित्त सूत्रधारी कंपनी, तिन्ही कंपन्यांचे संचालक (मासं), मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, कामगार संघटनांचे पदाधिकारी संजय खाडे, किशोर बागुल, अजय निकम, कॉम्रेड मोहन शर्मा,कृष्णा भोयर, अरूण पिवळ, दीपक भालेराव,आर.टी, देवकात,सुहास खुमकर,दत्तात्रय गुट्टे इत्यादी २७ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कामगार संघटना कृती समितीच्या वतीने युक्तिवाद करताना स्पष्ट करण्यात आले की सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये तिन्ही कंपन्यांतील अधिकारी कर्मचारी,अभियंते, व सहाय्यक कर्मचारी अतिशय चांगली कामगिरी महावितरण कंपनी मध्ये करत महसुला मध्ये प्रचंड वाढ केली. कोटी रुपयांचा वरती वीज चोऱ्या उघड करुन अतिरिक्त महसूल मिळवून दिला. सोबतच महानिर्मितीचे सर्वच संच यांनी सर्वोच्च कामगिरी करत विक्रमी वीज निर्मिती करत महाराष्ट्रास विज पुरवठा कमी पडू दिला नाही. तसेच महापारेषण कंपनीस देखील चांगल्या कामगिरीमुळे नफा अधिकारी अभियंता व कर्मचारी वर्गानी मिळवून दिलेला आहे.

प्रधान ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापन यानी कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील भ्रमणध्वनीवर विचार विनिमय करून अधिकारी,अभियंते,कर्मचारी यांना रु.१८,५००/- सानुग्रह अनुदान /बोनस जाहीर केला. तर सहाय्यक कर्मचारी यांना रु.१२,५००/- सानुग्रह अनुदान / बोनस जाहीर केला.

सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना बोनस दिवाळीपूर्वी बँक खात्यावर जमा करण्यात येईल अशी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तिन्ही कंपनी स्तरावर स्वतंत्ररीत्या सानुग्रह अनुदान / बोनस मंजूर करण्यात आल्याबाबतचे प्रशासकीय परिपत्रक देखील निर्गमित करण्यात आलेले आहे. अशी माहीती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे सरचिटणीस संजय खाडे यांनी दिली.
संघटनेच्या वतीने वरिष्ठ पातळीवरील सर्व अधिकाऱ्यांचे, ऊर्जा मंत्री यांचे संजय खाडे, यांनी मनपूर्वक आभार मानले व धन्यवाद दिले.

Back to top button
error: Content is protected !!