तिरुपतीला जाणे आता सोयिस्कर ! नांदेडहून इरोडला जाण्यासाठी विशेष रेल्वेच्या 22 फेऱ्या !!
नांदेड, दि. १८ – प्रवाशांची मागणी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने हजूर साहिब नांदेड ते इरोड (तामिळनाडू) दरम्यान विशेष गाडीच्या 22 फेऱ्या चालविण्याचे ठरवले आहे. या गाडीमुळे तिरुपतीला जाणे सोयिस्कर होणार आहे.
1. गाडी क्र. 07189 हजूर साहिब नांदेड ते इरोड विशेष गाडी (साप्ताहिक-शुक्रवारी) : ही गाडी हजूर साहिब नांदेड येथून दर शुक्रवारी दुपारी 14.20 वाजता सुटेल आणि मुदखेड, निझामाबाद, सिकंदराबाद, गुंटूर, रेणीगुंठा, काटपाडी, सालेम मार्गे इरोड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 14.00 वाजता पोहोचेल. ही गाडी नांदेड येथून दिनांक 21 एप्रिल ते 30 जून, 2023 दरम्यान दर शुक्रवारी सुटेल. (11-फेऱ्या)
2. गाडी क्र. 07190 इरोड ते हजूर साहिब नांदेड विशेष गाडी (साप्ताहिक-रविवारी) : ही गाडी इरोड येथून दर रविवारी सकाळी 05.15 वाजता सुटेल आणि सालेम, काटपाडी, रेणीगुंठा, गुंटूर, सिकंदराबाद, निझामाबाद, मुदखेड मार्गे हजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 07.30 वाजता पोहोचेल.
ही गाडी इरोड येथून दिनांक 23 एप्रिल ते 02 जुलै, 2023 दरम्यान दर रविवारी सुटेल. (11-फेऱ्या). या गाडीत वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल असे 18 डब्बे असतील.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe