खुलताबादछत्रपती संभाजीनगर
Trending

वेरुळसाठी महाशिवरात्रीनिमित्त औरंगाबाद स्मार्ट शहर बस विभागतर्फे ३० बसेस ! मध्यवर्ती बसस्टॅंड ते वेरुळ दर पाच मिनिटाला बस !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – महाशिवरात्री निमित्त वेरुळसाठी औरंगाबाद स्मार्ट शहर बस विभागतर्फे ३० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय मध्यवर्ती बसस्टॅंड ते वेरुळ दर पाच मिनिटांना बस सेवा उपलब्ध राहणार आहे. यामुळे औरंगाबादच्या शिवभक्ताना घृष्णेश्वराचे दर्शन घेण्यासाठीचा वेरुळपर्यंतचा प्रवास सुलभ होणार आहे. दरम्यान, उद्या १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र आहे.

घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात. महाशिवरात्रीला या मंदिरात देशभरातून लाखो भाविक दर्शनाला येत असतात.

औरंगाबादच्या भाविकांची दर्शनाची सोय व्हावी व वेरुळपर्यंत सुखरुप प्रवास व्हावा यासाठी औरंगाबाद स्मार्ट शहर बस विभागतर्फे ३० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सदरील बस या सिडको, टीव्ही सेंटर, हर्सूल टी पॉइंट, हडको कॉर्नर, रेल्वे स्टेशन येथून उपलब्ध असणार आहेत.

मध्यवर्ती बस स्थानक ते वेरुळ दर पाच मिनिटाला बस उपलब्ध असणार आहेत. प्रवाश्यांनी स्मार्ट शहर बस ८० रुपये पासचा लाभ घ्यावा व औरंगाबाद स्मार्ट शहर बस ने प्रवास करावा असे आवाहन औरंगाबाद स्मार्ट शहर बस विभागा तर्फे करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!