छत्रपती संभाजीनगर
Trending

सिडको औरंगाबाद ते बनसोड क्लासेस दरम्यान विद्यार्थिनीचे अपहरण !

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ –सिडको औरंगाबाद ते बनसोड क्लासेस दरम्यान विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. दररोज नेहमीप्रमाणे बनसोड क्लासेसला जाणारी ११ वीची विद्यार्थिनी घरी न परतल्याने तिच्या वडीलांनी सिडको पोलिस स्टेशन गाठून सविस्तर हकिकत सांगितली.

यासंदर्भात विद्यार्थिनीच्या पित्याने सिडको पोलिसांना दिलेली माहिती अशी की, त्यांची मुलगी इयत्ता 11वी मध्ये शिकत असून तिला सध्या बनसोड क्लासेस येथे क्लास लावलेला आहे. ती दररोज सकाळी 07.00वाजेला क्लासेसला जाते व सायंकाळी 04.00 ते 04.30 वाजेदरम्यान घरी परत येते.

दि. 16/02/2023 रोजी वेळ सकाळी 07.00 वाजता सुमारास विद्यार्थिनी व तिची मैत्रिण यांना बनसोड क्लासेस एन-3, सिडको, औ.बाद येथे सोडण्यासाठी मैत्रिणीचे वडील हे त्यांच्या मोटारसायकलने सिडको, औरंगाबाद येथून घेऊन बनसोड क्लासेसमध्ये सोडण्यासाठी घेऊन गेले. त्यावेळी फिर्यादी वडील घरी नव्हते. परंतु त्यांची पत्नी व आई वडील असे सर्व घरामध्ये होते.

नेहमीप्रमाणे सांयकाळी फिर्यादी वडील त्यांच्या मुलीला व तिच्या मैत्रिणीला क्लासमधून घरी आणण्यासाठी बनसोड क्लासेसला गेले असता तेथे क्लास सुटल्यावर फिर्यादीच्या मुलीची मैत्रिण एकटीच क्लासेसच्या बाहेर आली. तेव्हा फिर्यादीने त्यांच्या मुलीविषयी तिच्या मैत्रिणीला विचारले असता तिने सांगितले की, ती सकाळी तिचे पोट दुखत असल्याने क्लासमध्ये आली नाही. मी आत्ता वॉश रूम वरुन जाऊन येते असे सांगून ती क्लासच्या बाहेर थांबली व मी क्लासमध्ये गेले. परंतु ती नंतर क्लासमध्ये आलीच नाही, असे तिच्या मैत्रिणीने फिर्यादीच्या वडीलांना सांगितले.

फिर्यादीने मुलीच्या मैत्रिणीना तसेच आजुबाजुला तसेच नातेवाईकाकडे सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे विद्यार्थिनीच्या वडीलाने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले असल्याची फिर्याद सिडको पोलिस स्टेशनमध्ये दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!