महाराष्ट्र
Trending

50 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार !

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी राजभवनात अनावरण

मुंबई, दि. ५ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने एक टपाल तिकीट काढण्याचा निर्णय घेतला असून येत्या मंगळवारी, 6 जून रोजी महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथील दरबार हॉल मध्ये समारंभपूर्वक या तिकिटाचे अनावरण होणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे. कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची गाढ प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून त्यांचा विचार जगभरात जना जनानांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा दृढ निश्चय महाराष्ट्र सरकारने घेतला असून याचाच एक भाग म्हणून महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचा महाराष्ट्र शासनाचा विचार असून मॉ जिजाबाई यांची यामागील भावना, संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्याचा यामागील उद्देश आहे. महाराजांच्या काळांतील नाणी, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळप्रत्येक गोष्ट ही प्रेरणादायी आहे; या प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग पुढे सरसावला आहे. अस्मानी पातशाह्यांना टक्कर देणारा आणि स्वतःच्या जोरावर स्वराज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी हे महान राजे खरे नायक आहेत; हे भावी पिढीलासुद्धा कळावे ही यामागील भावना आहे.

शिववंदना कार्यक्रमाचे आयोजन- टपाल तिकीट अनावरणा नंतर सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने शिववंदना या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!