महाराष्ट्र
Trending

बीडमध्ये गुंडाराज: पोलिस कॉन्स्टेबलला गाडी आडवी लावून मारहाण ! ढाब्यावर गाडी पार्क करताच तूच आहे कारे पोलिस म्हणून सात जणांनी बेदम मारले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – रजेवर असलेले पोलिस कॉन्स्टेबल व त्यांचे सहकारी हे ढाब्यावर जेवण करण्यासाठी दुचाकीवर जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांसोबत वाद झाला. शिवीगाळ करून प्रकरण येथेच थांबले नाही. पुढे ढाब्यावर दुचाकी पार्क करत असताना तेथे सहा ते सात जण आले आणि तूच आहे का रे पोलिस असे म्हणून त्यांनी पोलिस कॉन्स्टेबल यांना मारहाण केली. यात पोलिस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी जगदीश लांडगे याच्यासह ७ जणांवर बीड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत ज्ञानदेव सानप (वय 28 वर्षे व्यवसाय- नौकरी रा. कालीकानगर नगर रोड बीड ता.जि. बीड) असे जखमी पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे पोलीस कॉन्टेबल म्हणून गेल्या दीड वर्षापासून ते कार्यरत आहे. दि-22/05/2023 रोजी पासून सात दिवसाच्या अर्जीत रजेवर ते आहे.

पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत ज्ञानदेव सानप यांनी बीड ग्रामीण पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, दि 25/05/2023 रोजी रात्री 08.35 वाजेच्या सुमारास  पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत ज्ञानदेव सानप व अन्य एक जण असे दोघे इलेक्ट्रीक स्कूटीवर शेंडगे धाबा नगर रोडला जेवनासाठी चालले होते. जेवनासाठी जात असतांना पांडुरंग पेट्रोल पंपाच्या पुढे गेल्यानंतर पाठीमागुन स्प्लेंडर मोटार सायकलवर दोघेजन आले. ते दोघे  पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत ज्ञानदेव सानप यांना म्हणाले की, तुमच्या बापाचा रस्ता आहे का, निट चला अश्लिल शिवी दिली.

नंतर त्यांनी त्यांची गाडी आडवी लावून  पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत ज्ञानदेव सानप यांना आडविले. शिवीगाळ करु लागले. त्या वेळी अभिजीत ज्ञानदेव सानप यांनी त्यांना पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर ते बाचाबाची करून पुढे गेले. दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत ज्ञानदेव सानप यांनी त्यांच्या गाडीचा नंबर नोट करून घेतला. त्यानंतर  पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत ज्ञानदेव सानप व त्यांचे सहकारी शेंडगे धाबा येथे रात्री 21.00 वाजता पोहोचले.

त्या ठिकाणी गाडी पार्क करत असताना त्यांच्या समोर पाच ते सहा जण आले. तूच आहे कारे पोलीस असे म्हणून एकाने मारहान करण्यास सुरूवात केली. त्याच वेळी पाठिमागे आडवलेल्या मोटार सायकल वरील दोघेजण तेथे आले. ते दोघे  पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत ज्ञानदेव सानप यांना मारहाण करनारा मुलगा यास जगदीश लांडगे असे हाक मारून या पोलीसाला मारा हा लय माजलाय असे म्हणाले. जगदीश लांडगे याने धारदार शस्त्राने पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत ज्ञानदेव सानप यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. इतर जणांनी एका लाकडी दांड्याने डोक्यात व हातपायावर मारून जखमी केले.

दरम्यान,  पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत ज्ञानदेव सानप यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना फोन केला असता पोलीसांची गाडी पाठवा असे म्हणताच हल्लेखोरांनी जास्त मारहान करण्यास सुरूवात केली. त्यांच्या तावडीतून कसेबसे सुटून शेंडगे धाब्याचे पाठीमागे  पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत ज्ञानदेव सानप लपून बसले. त्यानंतर पोलीस गाडी आल्यानंतर पाठीमागे पोलीस घेण्यासाठी आले असता  पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत ज्ञानदेव सानप हे समोर आले.  पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत ज्ञानदेव सानप यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असल्यामुळे पोलिसांनी सरकारी दवाखाना बीड येथे दाखल केले. वार्ड क्रं 5 मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Back to top button
error: Content is protected !!