देश\विदेश
Trending

चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, स्मशानभूमीत मृतदेहांचा खच ! भारत सरकार अलर्ट मोडवर, २४ तासांत दोन मोठे निर्णय !!

Story Highlights
  • सोमवारी चीनमध्ये कोविडचे ३,८३,१७५ रुग्ण आढळले.
  • चीनमध्ये २०२३ पर्यंत १० लोकांचा या महामारीमुळे मृत्यू होण्याची शक्यता तज्ञ वर्तवत आहेत.

नवी दिल्ली, दि. २१ : महामारी कोरोनातून सावरत असतानाच आता चीनमध्ये वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा हाहाकार माजला आहे. भारत सरकार सतर्क झाले असून २४ तासांत दोन मोठे निर्णय घेतले आहेत. कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.  चीनशिवाय जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेतही कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. दरम्यान, सध्या चीनमध्ये मृतांची संख्या झपाट्याने वाढत असून स्मशानभूमीत मृतदेहांचा खच दिसून येत आहे. चीनमध्ये २०२३ पर्यंत १० लोकांचा या महामारीमुळे मृत्यू होण्याची शक्यता तज्ञ वर्तवत आहेत.

जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि अमेरिकेत कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये अचानक झालेली वाढ पाहता, केंद्र सरकारने मंगळवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जीनोम सिक्वेसिंगला, व्हायरसच्या नवीन प्रकारांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यासंदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, अशा प्रकारच्या सतर्कतेमुळे देशातील विषाणूचे नवीन प्रकार वेळेवर शोधणे शक्य होईल. तसेच सार्वजनिक आरोग्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास मदत होईल. त्यांनी अधोरेखित केले की चाचणी-निरीक्षण-उपचार-लसीकरण आणि कोविड-योग्य वर्तनाचे पालन केल्याने भारत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात सक्षम झाला आहे.

सोमवारी चीनमध्ये कोविडचे ३,८३,१७५ रुग्ण आढळले. चीनमध्ये येत्या काही महिन्यांत कोरोनाबाधितांचा आकडा आणि मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शी जिनपिंग सरकारने नुकतेच कोरोनाशी संबंधित निर्बंध शिथिल केले होते.

चीन, जपान, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले असल्याने भारत सरकारने राज्य सरकारांना जीनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी बैठक बोलावली असून त्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!