- पोलीस उप निरीक्षक ते अपर पोलीस अधिक्षक यांच्या गणवेष अनुदानात वाढ करुन प्रतिवर्षी रु.६,०००/- (अक्षरी रुपये सहा हजार फक्त) इतक्या गणेवष भत्त्यास मान्यता देण्यात येत आहे.
- हा शासन आदेश दिनांक ०१.०१.२०२३ पासून लागू राहील.
मुंबई, दि. ५ – पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेष भत्त्यात वाढ करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. राज्य सरकारने हा शासन निर्णय आज जारी करून पोलिसांना दिलासा दिला आहे.
शासन निर्णयान्वये पोलीस उप निरीक्षक ते अपर पोलीस अधिक्षक यांना दर चार वर्षाकरीता प्रत्येकी रु.५,०००/- इतके गणवेष अनुदान मंजूर करण्यात आले होते. सदर गणवेष अनुदानामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
पोलीस उप निरीक्षक ते अपर पोलीस अधिक्षक यांना दर चार वर्षाकरीता प्रत्येकी रु.५,०००/- इतक्या अनुदानास मान्यता देण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत असून, पोलीस उप निरीक्षक ते अपर पोलीस अधिक्षक यांच्या गणवेष अनुदानात वाढ करुन प्रतिवर्षी रु.६,०००/- (अक्षरी रुपये सहा हजार फक्त) इतक्या गणेवष भत्त्यास मान्यता देण्यात येत आहे. हा शासन आदेश दिनांक ०१.०१.२०२३ पासून लागू राहील.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe