वाल्मीची कामे मंजूर करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरकडून ३० हजारांची लाच घेताना लेखाधिकारी जाळ्यात !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – वाल्मी कार्यालयांतर्गत कामे मंजूर करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरच्या मित्राकडून ३० हजारांची लाच घेताना वाल्मीचे लेखाधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
.प्रदिप प्रल्हाद बाहेकर (वय 47 वर्ष, पद- लेखा अधीकारी, अतिरिक्त कार्यभार प्रशासकीय अधिकरी वाल्मी कार्यालय औरंगाबाद(वर्ग-2) व मोहन दशरथ शेलार (वय 52 वर्ष रा.व्हिजन सिटी औरंगाबाद, पद – लेखााधिकारी वर्ग-२ वाल्मी औरंगाबाद) अशी आरोपीची नावे आहेत.
तक्रारदार यांचे मित्र कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी वाल्मी कार्यालया अंतर्गत एकूण 1150000/- रुपयाचे काम मंजुर केले म्हणून व आणखी 890000/- काम मंजूर करण्यासाठी टक्के वारीप्रमाणे एकून 30000/- हजारांची तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष प्रदीप बाहेकर यांनी मागणी करून सापळा कारवाई दरम्यान लाचेची रक्कम मोहन शेलार यांनी स्वीकारली.
ही कारवाई संदिप आटोळे, पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक, मारुती पंडित पोलिस उप अधीक्षक, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक हनुमंत वारे सापळा पथक – पो.ना सुनील पाटिल, पो.ना.साईनाथ, तोडकर , पो.ना. विलास चव्हाण यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe