राजकारण
Trending

उद्धव ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयात धाव, तातडीने सुनावणी घेण्यास नकार ! उद्या नियमानुसार होणार मेन्शन !!

नवी दिल्ली, दि. २० – निवडणूक आयोगाने नुकताच ठाकरे गटाच्या विरोधात दिलेल्या फैसल्यावर आज ठाकरे गटाने तातडीची सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यालयाला केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार देऊन नियमाने उद्या मेन्शन करून या, असे सुनावले. यामुळे आता ठाकरे गटाच्या उद्या होणार्या सुप्रीम कोर्टाच्या मेन्शनिंगकडे लक्ष लागले आहे. तसेच कॅव्हेट दाखल करून शिंदे गटानेही सर्वोच्च न्यायालयातील पिटीशनची पूर्ण तयारी केली आहे.

शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह देण्यात येत असल्याच्या विरोधात ठाकरे गटाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव गटाच्या वकिलांनी आव्हान देत या प्रकरणाची सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या वकिलाला उद्या या प्रकरणासंदर्भात मेन्शन करण्यास सांगितले आहे.

उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांचा निवडणूक आयोगाकडे असलेल्या दाव्यावर निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व निव़णूक चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला बहाल केल्याचा निर्णय दिला आहे. या निकालावर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे. निवडणूक निर्णयाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा त्याच दिवशी केली होती.

विशेष म्हणजे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण, शिवसेनेचे नाव उद्धव ठाकरे यांच्याकडून हिसकावून घेतल्यानंतर एकनाथ शिंदेही स्वस्थ बसलेले नाहीत. शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवण्यासाठी ते त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर हालचाली करत आहेत. एक दिवसापूर्वी शिंदे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले होते. त्यामुळे शिंदे गटाचे म्हणनेही सर्वोच्च न्यायालयाला ऐकून घेणे क्रमप्राप्त आहे.

 

Back to top button
error: Content is protected !!