सिल्लोड
Trending

सिल्लोड कृषी कार्यालयातील लिपिकाला साडेचार हजारांची लाच घेताना पकडले ! पेन्शन मंजूर करण्यासाठीचा ऑनलाईन प्रस्ताव नागपूरला पाठवण्यासाठी घेतली लाच !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – पेन्शन मंजूर करण्यासाठीचा ऑनलाईन प्रस्ताव नागपूरला पाठवण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच घेताना सिल्लोड कृषी कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला रंगेहात पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात कनिष्ठ लिपिक अडकले.

काकाराव बाजीराव जिवरग (वय 52 वर्षे, व्यवसाय नोकरी पद, कनिष्ठ लिपिक, तालुका कृषी अधिकारी सिल्लोड, कार्यालय सिल्लोड (वर्ग 3) असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या वडिलांचे पेन्शन मंजूर करून आणण्यासाठी सेवा पुस्तक ऑनलाईन करून नागपूरला पाठविण्यास आरोपी काकाराव जिवरग यांनी पंचासंमक्ष लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली. दिनांक 02/03/2023 रोजी त्यांनी ५ हजारांची लाच मागितली. त्याच दिवशी तडजोडीअंती ४ हजार ५०० रुपये त्यांनी स्वीकारले.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक, मारुती पंडित,पोलिस उप अधीक्षक, सापळ अधिकारी दीपाली निकम, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – पोहेकॉ. रवींद्र काळे, पोना सुनील पाटील, शिरीष वाघ पोअ चांगदेव बागुल यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!