छत्रपती संभाजीनगर
Trending

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल ! पोलिसांनी परवानगी नाकारूनही नामांतरच्या विरोधात कँडल मार्च काढणे भोवले !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – पोलिसांनी परवानगी नाकारूनही नामांतर विरोधी कॅंडल मोर्च काढल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समिती पदाधिकारी तसेच इतर 1000 ते 1500 जणांवर छत्रपती संभाजीनगरमधील सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या प्रस्तावावर केंद्र शासनाने नुकतेच शिक्कामोर्तब केल्याने औरंगाबादचे नाव आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतरास विरोध दर्शवला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, काल छत्रपती संभाजीनगर शहरात कॅंडल मोर्च काढण्यात आला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती तरीही मोर्चा काढण्यात आला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अंमलदार प्रशांत रमेश साकला (सिटीचौक) हे सध्या गोपनिय शाखेत काम करतात. पोलिस अंमलदार साकला यांनी दिलेली माहिती अशी की, दि. 04/03/2023 रोजी पासून औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समिती तर्फे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया समोर साखळी उपोषण सुरु आहे. काल दि. 09/03/2023 रोजी औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे संयोजक मोहम्मद अय्युब जहागीरदार यांनी दि. 09/03/2023 रोजी 19.00 ते 22.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा भडकलगेट पर्यंत कँडल मार्च करीता परवानगी मिळणे बाबत प्रांतोष वाघमारे यांच्या हस्ते पो.स्टे. सिटीचौक येथे अर्ज दिला होता. प्रांतोष वाघमारे यांना नमुद कैंडल मार्चची परवानगी पोलीस ठाणे सिटीचौक यांनी दि. 09/03/2023 रोजी नाकारून त्यांना सी.आर.पी.सी. कलम 149 प्रमाणे नोटीस देण्यात आली होती.

दि. 09/03/2023 रोजी 18.00 वाजे पासून पोलिस अंमलदार प्रशांत रमेश साकला, पोनि. संभाजी पवार, पो.स्टे. सिडको, पोनि देवकर, पो.स्टे. हर्सूल, पोनि, पोटे, पो.स्टे. बेगमपुरा, पोनि संतोष पाटील, पो.स्टे. क्रांतिचौक, सपोनि कराळे, पो.स्टे, सिटीचौक, सपोनि वायदंडे, पोउपनि शाकेर शेख सिटीचौक, श्रेणी पोउपनि परदेशी, पो.स्टे. सिटीचौक, सफौ. आरेफ, पो.स्टे. सिटीचौक पोह गोरे, पो.स्टे. सिटीचौक व इतर अधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे बंदोबस्ताकरीता हजर होते.

औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समिती तर्फे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली महफुझ उर्रहमान फारुकी, आरेफ हुसैनी, फेरोज खान, नासेर सिद्दीकी, मोहम्मद समी बिल्डर, शकुर सालार, शारेक नक्षबंदी कुनाल खरात, प्रांतोष वाघमारे, गंगाधर ढगे, गाजी सादोद्दीन उर्फ पप्पु कलानी, सलीम सहारा, वाजीद जहागीरदार, काकासाहेब काकडे, रफीक चिता, जमीर कादरी, मुंशी पटेल, रफत यारखान, नुसरत अली खान, हाशम चॉऊस, अबुल हसन हाशमी, परवेज अहमद, शकुर अहमद, बाबा बिल्डर, मोबीन अहमद, शोएब अहमद व औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समिती पदाधिकारी यांनी 19.40 वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी 1000 ते 1500 लोकांचा जमाव जमवला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथून कॅंडल मार्चला सुरुवात करून रंगीन दरवाजा, आमखास मैदान, भडकलगेट ते परत जिल्हाधिकारी कार्यालय येथे 21.20 वाजेच्या सुमारास परत आले. त्यांनी कॅंडल मार्च दरम्यान औरंगाबाद जिंदाबाद, जब तक सुरज चाँद रहेगा औरंगाबाद तेरा नाम रहेगा व इतर घोषणा दिल्या.

तरी दि. 09/03/2023 रोजी 19.40 ते 21.20 वा. दरम्यान या सर्वांनी बेकायदेशिररित्या जमाव जमवून विना परवानगी जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकलगेट व परत जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत कँडल मार्च काढून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) चे उल्लंघन केल्याची तक्रार पोलिस अंमलदार प्रशांत रमेश साकला यांनी दिली आहे.

या  तक्रारीवरून खासदार इम्तियाज जलील, औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे संयोजक अय्युब जहागीरदार, महफुझ उर्रहमान फारुकी, आरेफ हुसैनी, फेरोज खान, नासेर सिद्दीकी, मोहम्मद समीर बिल्डर, शकुर सालार, शारेक नक्षबंदी, कुनाल खरात, प्रांतोष वाघमारे, गंगाधर ढगे, गाजी सादोद्दीन उर्फ पप्पू कलानी, सलीम सहारा, वाजीद जहागीरदार, काकासाहेब काकडे, रफीक चिता, जमीर कादरी, मुंशी पटेल, रफत यारखान, नुसरत अली खान, हाशम चौऊस, अबुल हसन हाशमी, परवेज अहमद, शकुर अहमद बाबा बिल्डर, मोबीन अहमद, शोएब अहमद व औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समिती पदाधिकारी तसेच इतर 1000 ते 1500 बेकायदेशिर जमाव यांचे विरुध्द कलम 143 भा.दं.वि. व म.पो. का. 135 प्रमाणे कायदेशिर फिर्याद देण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!