आझाद चौक ते रोशन गेट रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा ! राम मंदिर लगत सहा हातगाड्या व दोन लोखंडी टपऱ्या काढल्या !
चारचाकी वाहनधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ मार्च – महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आज आजाद चौक ते राम मंदिर व पुढे रोशन गेट पर्यंत अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
आज सकाळी आझाद चौक ते राम मंदिर या रस्त्यावर एकूण दहा चारचाकी वाहनधारका विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात छोटा हत्ती आणि इतर प्रकारच्या कार यांनी रस्त्यामध्ये गाड्या उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. यामुळे या भागात अपघात होऊन तणाव निर्माण होत होते. तसेच रस्त्यावर दहा बाय दहाचे ओटे बांधून शेड तयार करण्यात आलेले सात शेडही काढून टाकण्यात आले.
राम मंदिर लगत सहा हातगाड्या व दोन लोखंडी टपऱ्या काढण्यात आल्या. राम मंदिर ते रोशन गेट रस्त्यावरील एकूण दोन भंगार वाहने जप्त करून या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलेले पत्र्याचे शेड, दोन लोखंडी टपऱ्या, दोन रसवंती ग्रह आणि वाळू विक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यानंतर टीव्ही सेंटर येथील पाच ओटे काढून दोन टेलिफोन खांब काढण्यात आले.
ही कारवाई प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त -२ तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे , जिन्सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद ,रामेश्वर सुरासे, व जिन्सी पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतल्याची माहिती देण्यात आली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe