महाराष्ट्र
Trending

बदनापूर: निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.देवेश दत्ताभाऊ पाथ्रीकरांचा अनोखा उपक्रम ! आरोग्य शिबिरात १६५६ रुग्णांची तपासणी !!

जालना, दि. १९ – निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.देवेश दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सामाजिक बांधिकलकीतून उपक्रम राबवला. बदनापूर न्यू लाईफ केअर हॉस्पिटल व चिकलठाणा लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाथ्रीकर कॅम्पस मध्ये १९ एप्रिल रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून या शिबिरात १६५६ रुग्णांची तपासणी केली. ८२९ रुग्णांना मोफत चसमें वाटप करण्यात आले. यासह गरजू रुग्णांना औषधी देण्यात आले. याशिवाय २५८ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तारीख देण्यात आली.

निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने बदनापूर विधानसभा मतदार संघात शिक्षणाबरोबर सामाजिक उपक्रम एक वर्षांपासून राबविले जात आहे. १९ एप्रिल २०२२ रोजी या संस्थेच्या वतीने मतदारसंघात पहिला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

त्यामुळे संस्थेने नियमित गावोगावी जाऊन शिबिरे घेतली व गरिबांना नेत्र देण्याचे काम केले. एका वर्षात २३ हजार ८१ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तर १६७२ रुग्णानाचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णानावर येणे जाणे, भोजनावरील सर्व खर्च संस्थने केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त संस्थचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.देवेश दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी मोफत चसमें वाटप करण्याचा निर्णय घेऊन १९ एप्रिल रोजी पाथ्रीकर कॅंपस मध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंधु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन मोनू रवींद्रन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बदनापूर विधानसभा मतदार संघातील महिला पुरुष असे १६५६ रुगणांनी सहभाग नोंदविला असता त्यांची नेत्र तपासणी करून मोफत औषधी तसेच ८२९ रुग्नांना मोफत चसमें वाटप करण्यात आले. या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्नांपैकी २५८ रुग्णानाचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांना शस्त्रक्रियेसाठी तारखा दिल्या.

Back to top button
error: Content is protected !!