छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी रस्त्यावर उतरून जाणून घेतल्या समस्या !
स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांची पाहणी
संभाजीनगर लाईव्ह, दि. २० -: मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ जी श्रीकांत यांनी शनिवारी सकाळी स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांची पाहणी केली. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व संबंधित मनपा व स्मार्ट सिटीच्या अधिकारी व प्रकल्प सल्लागार यांना सूचना केल्या.
मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी शनिवारी सकाळी 6 वाजेपासून अधिकाऱ्यांबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन रस्त्यांची पाहणी केली. जवाहर कॉलनी पोलीस स्टेशन ते सावरकर चौक, रामायण हॉल उल्का नगरी ते विभागीय क्रीडा संकुल व विवेकानंद चौक ते अग्निहोत्र चौक या रसत्यांची पाहणी केली.
स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांचा बांधकाम करताना पर्यायी रस्ता देणे, नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा याची खात्री करणे, जलवाहिनी व ड्रेनेजच्या देखभाल दुरुस्तीसाठी उपायव्यवस्था देणे आदी विविध सूचना मनपा प्रशासक व आयुक्त जी श्रीकांत यांनी शनिवारी सकाळी रस्त्यांची पाहणी करताना दिल्या.
यावेळेस नागरिक व लोकप्रतीनिधींच्या समस्या प्रशासक जी श्रकांत यांनी जाणून घेतल्या व स्वच्छतेबाबत आणि इतर तक्रारीबद्दल संबंधितांना सूचना केल्या. यावेळेस स्मार्ट सिटीचे इम्रान खान, किरण आढे व प्रकल्प सल्लागार समीर जोशी उपस्थित होते.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe