माजी आमदार आशिष देशमुख यांची कॉंग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी ! पक्षविरोधी वर्तन व जाहीर वक्तव्याबद्दल कारवाई !!
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासन करण्याचा निर्णय
मुंबई, दि. २४ – अखेर कॉंग्रेसने माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर कारवाई केली. पक्षाच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांना सहा वर्षांसाठी कॉंग्रेसमधून निष्काषित केले आहे. पक्ष व नेत्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून जाहीरपणे पक्षविरोधी भूमिका घेत होते. राहुल गांधी व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर त्यांनी आक्षेपार्ह केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तिपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर केलेल्या कारवाई आदेशात नमूद केले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने दि. ०५ मार्च २०२३ रोजीच्या पाठविलेल्या कारणे दाखवा नोटीसला दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजीच्या आपल्यामार्फत मिळालेल्या उत्तरावर समितीने चर्चा केली आहे.
आपण आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल व जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात.
आपण केलेल्या पक्षविरोधी वक्तव्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने तुम्हाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आदेशाद्वारे पक्षविरोधी कारवायांकरीता आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरुन पुढील सहा वर्षाकरिता तात्काळ निष्कासित करण्यात येत असेल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तिपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी आदेशात नमूद केले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe