हडको सिडको भागांत अतिक्रमण कारवाई ! जिजाऊ चौक ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा रस्ता मोकळा !!
संभाजीनगर लाईव्ह, दि.१० – महानगरपालिकेच्या वतीने शहरातील हडको सिडको भागात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. अतिक्रमण हटाव विभागा मार्फत पुन्हा एकदा उच्च न्यायालयाचे आदेश जनहित याचिका क्रमांक १०९ २०१५ अंतर्गत आज सकाळी टीव्ही सेंटर भागातील एकूण २२ अतिक्रमण धारका विरुद्ध कारवाई करण्यात आली.
या २२ अतिक्रमण धारकांनी आपल्या दुकानासमोर दहा बाय पंधरा दहा बाय दहा आठ बाय दहा व वीस बाय 10 या आकाराच्या जागेमध्ये माती विटा सिमेंटचे बांधकाम करून मोठे ओटे बांधले होते. या ओट्यामुळे जिजाऊ चौक ते संभाजी महाराज पुतळ्याकडे जाणारा रस्ता अतिशय अरुंद झाला होता आणि यामुळे या ठिकाणी दररोज सायंकाळी वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होत होते.
या अंतर्गत सकाळी जिजाऊ चौक साई पान सेंटर,जय भद्रा चायनीज हॉटेल, स्नेहल सागर चायनीज रॉक अँड रोल, वैशाली पान सेंटर, शारदा फरसाण, मोना बियर बार अशा दुकानदारांनी अतिक्रमण केले होते. जेसीबीच्या साह्याने हे सर्व ओटे जमीनदोस्त करण्यात आले व मलबा उचलून जेसीबीच्या साह्याने रस्ता वाहतुकीला खुला करण्यात आला आहे.
प्रथम या नागरिकांना एक महिना पूर्वीच महापालिकेच्या वतीने सूचना देण्यात आल्या होत्या तरीदेखील काही व्यापाऱ्यांनी या सूचनाचे पालन न केल्याने या सर्व अतिक्रमण धारका विरुद्ध आज कारवाई करण्यात आली. याच रस्त्यावर फुल विक्रेते बसत असल्याने त्यांचे आणि पायी चालणारे नागरिकांचेही खटके उडायचे आणि भांडण व्हायचे त्यांनाही आज कडक ताकीद देऊन पाठीमागे सरकविण्यात आले. आता हे सर्व अतिक्रमण निघाल्याने रस्ता पूर्ण मोकळा झाला आहे. लवकरच पोलीस चौकीचे काम सुरू होणार असल्याने रस्ता अजून मोठा होईल.
दुसऱ्या पथकाने सिडको बस स्टॅन्ड ते रामनगर, रामनगर ते झेंडा चौक पुंडलिक नगर जय भवानीनगर गोकुळ स्वीट पुंडलिक नगर पाणी टाकी या रस्त्यावर कारवाई केली. या पथकाने सुद्धा रस्त्यामध्ये आलेले रस्त्याला बाधित करणारे वाहतुकीला अडथळा करणारे अतिक्रमण धारकाविरुद्ध कारवाई केली.
आजची कारवाई प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त ०२ आयुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त ०१ तथा अतिक्रमण विभाग प्रमुख सविता सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये अतिक्रमण निरीक्षक पंडित गवळी, सय्यद जमशेद रामेश्वर, सुरासे झोन क्रमांक ०४चे स्वच्छता निरीक्षक देवकर , सुहास भाले या सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी सिडको वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जलील अहमद यांनीही पथकाला मदत केली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe