छत्रपती संभाजीनगर: काबरानगर परिसरातील बड्या जुगार अड्यावर गुन्हे शाखेचा छापा ! नामांकित 17 जणांना पकडले, 438500 रुपयांचा मुद्देमाल जप्त !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२- शहरातील काबरानगर परिसरात गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने जुगाराच्या अड्यावर छापा टाकला. 4,38,500/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. खबर्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून हा जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त केला.
दिनांक ११/०६/२०२३ रोजी २१.०० वाजेपासून गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक अजित दगडखैर यांचे पथक पोलीस आयुक्तालय हद्दतील आस्थापना रात्री विहीत वेळेत बंद करणे कामी पेट्रोलिंग करीत होते. रात्री ०१.०० वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीलायक माहीती मिळाली की, एक जण हा त्याच्या राहते घराच्या मागे मोकळ्या जागेत लोकांना जमा करून पत्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत आहे.
यावरून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून पोलीस पथक व पंचासह जावून छापा मारला. सदर ठिकाणी 1) समीर खान उमर खान (वय 24 वर्षे, धंदा- मजुरी, रा. काबरानगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर), 2) शेख रफिक शेख शफिक (वय 25 वर्षे, धंदा – व्यापार, रा. गुलशन मस्जिद जवळ, खोकडपुरा, पैठणगेट, छत्रपती संभाजीनगर), 3) शेख सत्तार शेख वजीर (वय 45 वर्षे, धंदा व्यापार, रा. ग.नं. 17, किराडपुरा, रोषणगेट रोड, छत्रपती संभाजीनगर) 4) भूषण मच्छिंद्र हिवराळे (वय 45 वर्षे, धंदा व्यापार, रा. ग.नं. 17, किराडपुरा, रोषणगेट रोड, छत्रपती संभाजीनगर), 5) सलीम खान मुनाफ खान, वय 44 वर्षे, धंदा – व्यापार, रा. रहेमानीया कॉलनी, छत्रपती संभाजीनगर), 6) रफिक खान मोहम्मद खान (वय 48 वर्षे, धंदा – व्यापार, रा. काबरानगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर),
7) शेख आवेज शेख अहेमद (वय 34 वर्षे, धंदा – मजुरी, रा. जयसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर), 8) मनोज अशोक लहरे (वय 29 वर्षे, धंदा – खा. नोकरी, रा. बेगमपुरा, थत्ते हौदाजवळ, छत्रपती संभाजीनगर), 9) अब्दुल अझहर अब्दुल रहेमान (वय 40 वर्षे, धंदा व्यापार, रा. रमनस्तपुरा, जिन्सी, छत्रपती संभाजीनगर), 10) शेख रशिद शेख याकुब (वय 52 वर्षे, धंदा – व्यापार, रा. हडको कॉर्नर, एन 12, छत्रपती संभाजीनगर) 11) शेख वाजेद शेख अब्दुल रहिम (वय 32 वर्षे, धंदा मजुरी, रा. सादातनगर, रेल्वेस्टेशन परिसर, छत्रपती संभाजीनगर), 12) जगदीश जयसिंगराव जाधव (वय 48 वर्षे, धंदा – व्यापार, रा. बेगमपुरा, छत्रपती संभाजीनगर) 13) सुरज राधाकिसन नंदवंशी (वय 34 वर्षे, धंदा – व्यापार, रा. बेगमपुरा, छत्रपती संभाजीनगर) हे पत्त्यावर पैसे लावुन तिर्रट नावाचा जुगार खेळताना मिळून आले आहेत.
गुन्हे शाखेचा छापा ल्यानंतर काही जण हे तेथुन पळून गेले ताब्यातील लोकांना त्यांची नाव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) जावेद खान मोहम्मद खान (रा. काबरानगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर), 2) सलमान खान मोहम्मद खान (रा. काबरानगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर), 3) अकबर खान मोईनोद्दीन खान (रा. शहागंज परिसर, राजाबाजार, छत्रपती संभाजीनगर), 4) शेख जमिल शेख ईस्माईल (रा. रहेमानिया कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) असे असल्याचे सांगितले.
त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य ज्यात ५२ पत्ते, रोख रक्कम, मोबाईल हॅण्डसेट, असे एकूण ४,३८,५००/- रुपये किमंतीचा मुद्देमाल गुन्हे शाखे मार्फत जप्त करण्यात आला असुन त्यांना मुद्देमालासह पोलीस ठाणे जवाहरनगर यांचे स्वाधीन करण्यात येवून त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अपर्णा गिते, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, छत्रपती संभाजीनगर, धनंजय पाटील, सहायक पोलीस आयुक्त, संदीप गुरमे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजित दगडखैर, पोउपनि रमाकांत पटारे, पोना संजय नंद, पोना मनोज चव्हाण, पोअं सुनील बेलकर, पोअं संदीप राशिनकर, पोअं अजय दहिवाळ यांच्या पथकाने केली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe