छत्रपती संभाजीनगर
Trending

वाळूजच्या स्कायलार्क टुल टेक्नॉलॉजीस इंजिनिअरिंग कंपनीतील मशिमध्ये सिल्लोड तालुक्यातील कामगाराच्या हाताची बोटे फ्रॅक्चर ! शैक्षणिक आर्हता व अनुभव नसतानाही मशिनवर बळजबरीने काम करायला भाग पाडल्याचा कामगाराचा आरोप !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – प्रेस मशिनमध्ये हात गेल्याने हाताची बोटे फ्रॅक्चर झाल्याची घटना स्कायलार्क टुल टेक्नॉलॉजीस इंजिनिअरिंग प्रा.लि., F-62, MIDC वाळुज या कंपनीत घडली. प्रेस मशिनवर कामाचा कोणताही अनुभव नसताना व यासंदर्भातील शैक्षणिक आर्हता नसतानाही प्रेस मशिनवर काम करण्यास भाग पाडल्याची तक्रार कामगाराने दिली असून याप्रकरणी ठेकेदार व सुपरवायझर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा श्रीरंग औटे (वय 25 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. ठि. मु.पो. उपळी, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर, ह.मु. भगतसिंग शाळेजवळ, जानेश्वरनगर, रांजणगाव (शेपू), ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे जखमी कामगाराचे नाव आहे.

कृष्णा श्रीरंग औटे यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार ते स्कायलार्क टुल टेक्नॉलॉजीस इंजिनिअरिंग प्रा. लि. MIDC वाळुज, छत्रपती संभाजीनगर येथे मशीन ऑपरेटर म्हणून काम करतात. कृष्णा श्रीरंग औटे यांचे इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण झालेले असून त्यांच्याकडे कंपनीत प्रेस मशीनवर काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तांत्रिक शिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र व अनुभव नाही. दिनांक 02/06/2023 रोजी सकाळी 8.00 वाजेच्या सुमारास सुपरवायझर रवी दिवे यांच्या मार्फतीने कृष्णा श्रीरंग औटे हे स्कायलार्क टुल टेक्नॉलॉजीस इंजिनिअरिंग प्रा.लि. येथे गेले.

तेथे ठेकेदार शाहेदभाई व सुपरवायझर रवी दिवे यांनी कृष्णा श्रीरंग औटे यांना सदर कंपनीत प्रेस मशीनवर काम करायला लावले. तेव्हा कृष्णा श्रीरंग औटे यांनी त्यांना सांगितले की, त्यांच्याकडे प्रेस मशीनवर काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तांत्रिक शिक्षण घेतल्या बाबतचे प्रमाणपत्र व अनुभव नाही. तेव्हा त्यांनी कृष्णा श्रीरंग औटे यांना सांगितले की, काही होत नाही, तू काम कर म्हणून कृष्णा श्रीरंग औटे यांनी जग्गी अँड जग्गी कंपनीच्या प्रेस मशीन 50 टन यावर काम करण्यास सुरुवात केली. सदर मशीनवर वाहनासाठी लागणारे पत्र्याचे जॉब बनविण्याचे काम केले.

त्यानंतर सांयकाळी 7.00 वाजेच्या सुमारास कामास सुट्टी झाल्याने कृष्णा श्रीरंग औटे हे कंपनीतून काम करुन घरी गेला. कृष्णा श्रीरंग औटे यांना सदर कंपनीत काम करायचे नसल्याने ते दिनांक 03/06/2023 व 04/06/2023 रोजी सदर कंपनीत कामावर गेले नाही. म्हणून सुपरवायझर रवी दिवे यांनी कृष्णा श्रीरंग औटे यांना फोन करून सदर कंपनीत कामावर बोलावून घेतले. त्यानंतर कृष्णा श्रीरंग औटे दिनांक 05/06/2023 रोजी सकाळी 7.00 वाजेच्या सुमारास स्कायलार्क टुल टेक्नॉलॉजीस इंजिनिअरिंग प्रा. लि. MIDC वाळूज येथे कामास गेले.

दिनांक 07/06/2023 रोजी सकाळी 07.00 वाजेच्या सुमारास स्कायलार्क टुल टेक्नॉलॉजीस इंजिनिअरिंग प्रा. लि. MIDC वाळुज येथे कामास ते गेले. सुपरवायझरने प्रेस मशीन सुरु करुन दिली. त्यानंतर कृष्णा श्रीरंग औटे यांनी काम करण्यास सुरुवात केली. सकाळी 08.15 वाजेच्या सुमारास प्रेस मशीनवर काम करीत असताना अचानक प्रेस मशीनमध्ये कृष्णा श्रीरंग औटे यांच्या डाव्या हाताची बोटे अडकल्याने त्यांनी हात पाठीमागे घेतला. कृष्णा श्रीरंग औटे यांच्या हाताच्या बोटातून रक्त निघु लागले व वेदना होत असल्याने कृष्णा श्रीरंग औटे हे जोराने ओरडलो.

तेव्हा कंपनीतील लोकांनी औषधोपचारकरीता वाळुज हॉस्पिटल, सिडको महानगर-1 याठिकाणी दाखल केले. कृष्णा श्रीरंग औटे यांच्या डाव्या हाताची पाचही बोटे फ्रेंक्चर झाली. तेथील डॉक्टरांनी डाव्या हाताच्या बोटांवर शस्त्रक्रिया करून उपचार केले. वाळुज हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी कृष्णा श्रीरंग औटे यांना डिस्चार्ज दिला व आराम करण्यास सांगितले. सध्याही कृष्णा श्रीरंग औटे यांना डाव्या हाताने काहीएक काम करता येत नाही. त्यामुळे कृष्णा श्रीरंग औटे यांनी एमआईडीसी वाळूज पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून ठेकेदार शहिद मोहमंद शेख, (2) सुपरवायझर रवी किशोर दिवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!