हर्सूलमध्ये माती काम करताना ओळख झाली, ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले ! पुढे असे काय झाले की, थेट चाकू हल्लाच चढवला ?
संभाजीनगर लाईव्ह, दि. १९- माती काम करताना ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात घडले. दोघे सोबतही राहू लागले. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने महिलेवर चाकुहल्ला केला. यात महिला जखमी झाली. ही घटना १७ जून रोजी ११.३० वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर परिसरात घडली.
राजु सुरेश गवळी (रा. मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, हर्सूल येथे माती काम करत असताना फिर्यादीची ओळख आरोपीशी झाली होती. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. फिर्यादी हे आरोपी यांचेसोबत त्याच्या घरी गेट क्र. 56 पत्र्याच्या शेडजवळ मुकुंदवाडी (छत्रपती संभाजीनगर) रहाण्यासाठी आले होते.
त्यानंतर आरोपी हा फिर्यादी यांच्याकडे पैशाची मागणी करु लागला. त्यास पैसे देण्यास नाकार दिला तेव्हा त्याने फिर्यादीस शिविगाळ केली. हाताचापटाने माराहण करुन त्याच्या खिशातून चाकू काढून डाव्या हातावर मारून जखमी केले. त्यानंतर तो घरातून निघून गेला.
याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून राजु सुरेश गवळी (रा. मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोना कांबळे करीत आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe