महाराष्ट्र
Trending

धाराशिवचा पोलिस हवालदार लाच घेताना चतुर्भुज, गुटखा व तंबाखुचा धंदा करू देण्यासाठी १२ हजार घेतले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – गुटखा व तंबाखुचा धंदा करू देणे व कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी १५ हजारांची लाच मागून तडजोडीअंती १२ हजारांची लाच घेताना धाराशिव पोलिस स्टेशनच्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही कारवाई आज, १९ जून रोजी केली.

महादेव वसंतराव शिंदे (वय- 45 वर्षे, पद- पोलीस हवालदार, वर्ग 3, धाराशिव शहर पोलीस स्टेशन, धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांना गुटखा व तंबाखूचा व्यवसाय सुरू करू देण्सासाठी व तक्रारदारावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदार महादेव वसंतराव शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे 15,000 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 12,000 रुपये लाच रक्कम लागलीच स्वीकारण्याचे मान्य करून पंच साक्षीदारा समक्ष स्वीकारताना पोलिस हवालदार महादेव वसंतराव शिंदे यांना ताब्यात घेतले.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, सिद्धराम म्हेत्रे, पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – विकास राठोड, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – सिद्धराम म्हेत्रे , पोलीस उपाधीक्षक, विकास राठोड, पोलीस निरीक्षक, पोलीस अमलदार मधुकर जाधव, आशिष पाटील, विशाल डोके यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!