फुलंब्रीमहाराष्ट्र
Trending

फुलंब्री तालुक्यातील 2775 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ, शासन आपल्या दारी !

“शासन आपल्या दारी” अभियानातून फुंलब्री तालुक्यातील गरजूंना मिळाला योजनेचा लाभ

संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – शेतकरी, महिला, वंचित घटकातील प्रत्येकांना विविध शासकीय योजनेचा लाभ त्यांच्या दारात जाऊन देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ‘आपले शासन’ ही भावना लाभार्थ्यांच्या व राज्यातील नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याचे दिसून येते. प्रशासनामार्फत सर्व विभागाच्या समन्वयाने कन्नड येथे शासन आपल्या दारी अभियानाचा शुभांरभ झाला होता. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही लाभर्थ्यांना प्रत्येक प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते. यामध्ये फुलंब्री तालुक्यातील 2 हजार 775 लाभर्थ्यांना विविध योजनेंचा लाभ देण्यात आला.

जिल्हा प्रशासन तालुक्याच्या पातळीवर नगरपालिका, भूमी अभिलेख, कृषि, रोजगार हमी योजना, महसूल या विभागाने आपल्या योजना लोकांपर्यंत पोहचविल्या आहेत. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी आवास योजना, श्रावण बाळ योजनेतून लाभर्थ्यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत मिळवून दिली आहे. सेतू सुविाधा केद्राअंतर्गत देखील दैंनादिन कामकाजासाठी लागणारे विविध प्रमाणपत्रे याचा समावेश होता. एकूण 337 लाभार्थी महसूल विभागातंर्गत प्रत्यक्ष लाभ देण्यात आला.

नागरिकांना विविध योजनेसाठी आवश्यक असणारे जन्म – मृत्यू प्रमाणपत्र नाहरकत प्रमाणपत्र असे एका दिवसात 196 प्रमाणपत्र नगर पंचायत फुलंब्री, कार्यालयाअंतर्गत देण्यात आले. शेती म्हणजे पिडीजात असलेली शेतकऱ्यांची संपत्ती. या संपत्तीच्या मालकीचे प्रमाणपत्रे, दस्त भूमि अभिलेख कार्यालयामार्फत दिले जातात. ते स्वामित्व याजनेत 36 लाभर्थ्यांना जमिनीच्या मालकीचे दस्त उपलब्ध करुन देण्यात आले. शिक्षण हक्क अधिनियमाअंतर्गत दुर्बल, आर्थिकमागास व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत 25 टक्के प्रवेश देण्यात येतो. यामध्ये सर्व शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यात येते. 50 विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चीत करण्यात आले.

शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करावी. यासाठी कृषि पूरक अवजारे व यंत्र पूरवली जातात. यामध्ये 1 हजार 260 लाभार्यीं शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण (एमआयडीएच) अंतर्गत लाभ देण्यात आला. याबरोबरच सिंचनासाठी वैयक्तिक व सामुहिक लाभाच्या सिंचन विहीरी, शेततळे, घरकुल तसेच जनावरासाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान देण्यात आले.

यामध्ये 866 शेतकरी लाभार्थ्यांना यांना लाभ देण्यात आला. असे एकूण 2 हजार 745 लाभार्थी फुलंब्री तालुक्यातून शासन आपल्या दारी अभियानातून लाभ दिला. यामुळे शासकीय योजना खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांच्या दारात ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून पोहचवण्यात यश झाले आहे.

Back to top button
error: Content is protected !!