मॉर्निंग वॉकला निघालेल्या माजी सैनिकाला टाटा सफारीची हर्सूल टी पॉईंटजवळ धडक ! जखमीला मदत न करता धक्काबुक्की करून गाडीचालक पसार !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – मॉर्निंग वॉकला निघालेल्या माजी सैनिकाला टाटा सफारीने समोरून धडक दिली. यात माजी सैनिकाला मुका मार लागला. जखमीला मदत न करता त्यास धक्काबुक्की करून गाडीचालक घटनास्थळावरून पसार झाला. ही घटना हर्सूल टी पॉईंट बस स्टॉप येथे सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.
कृष्णा तेजराव तायडे (वय ४१ वर्षे, रा. साफल्यनगर, हर्सूल परिसर, छत्रपती संभाजीनगर) असे जखमी माजी सैनिकाचे नाव आहे. यातील फिर्यादी माजी सैनिक कृष्णा तायडे हे मॉर्निंग वॉक करून हर्सुल टी पॉइंट कडे येत होते. या दरम्यान, समोरुन पांढ-या रंगाची टाटा सफारी गाडी नं. MH.20.BN.386 च्या चालकाने माजी सैनिक कृष्णा तायडे यांना धडक दिली. या अपघातात फिर्यादी माजी सैनिक कृष्णा तायडे यांच्या उजव्या पायाला मार लागून कंबरेला तसेच हाताला मुका मार लागला.
यावेळी फिर्यादी माजी सैनिक कृष्णा तायडे हे त्या गाडी चालकास म्हणाले की “ मी फुटपाथ वरुन चाललो आहे अख्खा रस्ता रिकामा असतांना तू गाडी निट का चालवत नाहीस.” असे म्हणुन त्या गाडीचा फोटो काढत असताना गाडीचालक व गाडीतील 3 अनोळखी लोगांनी गाडीतून खाली उतरून फिर्यादी माजी सैनिक कृष्णा तायडे यांना धक्काबुक्की केली. मारहाण करून जखमी माजी सैनिक कृष्णा तायडे यांना कोणतीही मदन न करता तेथून गाडीसह निघुन गेले.
कृष्णा तेजराव तायडे (वय ४१ वर्षे, रा. साफल्यनगर, हर्सूल परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवनरून सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये पांढर्या रंगाची टाटा सफारी गाडी नंबर MH.20.BN.386 चा चालक व इतर तीन अनोळखी अशा एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना गडवे करीत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe