पहिल्या दोन टप्प्यांत ५२० विद्यार्थ्यांचे प्रवेश ! वसतिगृह, कमवा व शिकाचे अर्जही जमा !!
-विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील प्रवेश
संभाजीनगर लाईव्ह, दि. १५ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पहिल्या दोन टप्प्यांत ५२० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. प्रवेश विद्यार्थ्यांची जागेवरच सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु असून दुसऱ्या टप्प्यात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील प्रवेश प्रक्रिया शनिवारी (दि.१५) राबविण्यात आली.
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ६६६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली . यातील ३७७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतले. रसायनशास्त्र विभागातील संपूर्ण प्रवेश यावेळी देण्यात आले महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठातील पदवीधर तसेच अन्य राज्यातील मंगळवारी पहिल्या टप्प्यात १४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील २० अभ्यासक्रमासाठी या विद्यार्थ्यांची प्रवेश समुपदेशन फेरी शनिवारी (दि.१५) सकाळी विद्यापीठ नाटयगृहात घेण्यात आली. या फेरीच्या तयारीचा आढावा कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी घेतला. यावेळी प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड, उपकुलसचिव डॉ.आय.आर.मंझा, उपपरिसर संचालक डॉ .प्रशांत दीक्षित, समिती सदस्य डॉ.राम चव्हाण, डॉ.भास्कर साठे आदींसह प्रवेश समितीचे २२ सदस्य उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड यांनी महत्वपूर्ण सूचना सांगितल्या.
विद्यापीठ नाटयगृहात शनिवारी सकाळी १० ते ५ या दरम्यान ही प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी विज्ञान शाखेतून मिळून ३७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या सर्व विद्यार्थ्यांना जागेवरच प्रवेश देण्यात आले. तसेच वसतिगृहाचे अर्ज व ‘कमवा व शिका’ योजनेचे अर्जही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या रसायनशास्त्र विभागात प्रवेश घेतलेल्या पहिल्या विद्यार्थिनीचा सत्कार यावेळी करण्यात आला .
प्रवेश प्रक्रियेसाठी २३ समित्यांची स्थापना करण्यात आली. पदव्यूत्तर विभागातील सर्व कर्मचारी तसेच युनिकचे यशपाल साळवे, दिनेश कोलते यांनी परिश्रम घेतले. डॉ.कैलास अंभुरे, डॉ.पुरुषोत्तम देशमुख व डॉ.अपर्णा अष्टपुत्रे यांनी या प्रक्रियेचे संचलन केले. या टप्प्यात विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेतील २० विभागात प्रवेश देण्यात आले यामध्ये मास्टर ऑफ सायन्स (एम.एस्सी) : बायोकेमेस्ट्री, केमेस्ट्री फॉरेन्सिक सायन्स, बॉटनी, कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजीयन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फिजीक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, स्टॅटस्टिक्स, झुलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो बॉयोलॉजी, ड्रग केमेस्ट्री, ऑर्गेनिक, केमेस्टी फुड टेक्नॉलॉजी, ड्रग अॅण्ड इंटमिजिएट टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ सायन्स इन कंझर्व्हेशन ऑफ बायो डायर्व्हसिटी, मास्टर ऑफ सायन्स इन रुरल टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ व्होकेशन इन प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी या विभागांचा समावेश आहे.
उर्वरित शाखांसाठी सोमवारी प्रवेश प्रक्रिया- मानव्यविद्या, आंतरविद्या, वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र या विद्याशाखेतील तसेच व्यायवसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यर्थ्यांना समुपदेशन प्रवेश फेरीच्या माध्यमातून सोमवारी (दि.१७ ) रोजी प्रवेश देण्यात येणार आहेत. पदव्यूत्तर विभागाच्या तासिका २६ जुलैपासून सुरु करण्यात येणार आहेत. तिसरी फेरी झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या सर्व जागांवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या व न केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना १८ ते २४ जुलै या दरम्यान स्पॉट ॲडमिशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पॉट अॅडमिशनच्या वेळी प्रवेश देण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांचा सर्वोगीण विकास हेच ध्येय : कुलगुरु
केवळ पदवी व नोकरी देण्यापूरताच मर्यादित शिक्षणाचा हेतू असतो तर माणसाचा सर्वांगीण विकास घडविणारे शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी केले. प्रवेशासाठी उपस्थित विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. देशातील सर्वाधिक संशोजक घडविणा-या आपल्या विद्यापीठात अत्यंत अन्य खर्चात शिक्षण, वसतीगृह या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही ते म्हणाले. अत्यंत सर्व सामान्य घरातील पदवीधर विद्यार्थी आपल्या विद्यापीठात पदव्यूत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यांना अत्यंत अल्पदरात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कमवा व शिका योजनेतंर्गत मानधनही वाढविण्यात आले आहे. नवीन विद्यार्थ्यांने विद्यापीठात स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe